top of page

जगभरात अवलंबिल्या जाणारे अवयवदान पॉलिसीचे प्रकार...

Updated: Sep 26, 2020

अवयवदानासाठी विविध देश आपल्या सिमांतर्गत वेगवेगळ्या प्रकारच्या पॉलिसीचे (धोरणांचे) अवलंबण करते. या करीता मुख़्यत: चार प्रकारचे धोरणे आहेत. ते पुढील प्रमाणे- सॉफ्ट ऑप्ट-इन, हार्ड ऑप्ट-इन, सॉफ्ट ऑप्ट-आऊट आणि हार्ड ऑप्ट-आउट.


जगभरात अवलंबिल्या जाणारे अवयवदान पॉलिसीचे प्रकार

ऑप्ट-इन पॉलिसी म्हणजे व्यक्तिला राष्ट्रीय नोंदणी (national registry) पुस्तिकेत अवयवदाता म्हणून नोंदणी करावी लागते.

जर एखाद्या व्यक्तीने रेजिस्ट्रीमध्ये नोंदणी केली असल्यास निगडित प्राधिकरण त्या व्यक्तिच्या मृत्यू आधीच त्याला/ तिला संभाव्य अवयवदाता असल्याचे गृहित धरते. परंतू अवयव दान करायचं की नाही याविषयीचा शेवटचा निर्णय हा त्या कुटुंबाचा असतो. हार्ड ऑप्ट-इन पॉलिसी अंतर्गत एखद्या व्यक्तीने 'मृत्यूनंतर आपले अवयव दान केले जावेत' हे स्पष्ट केले असल्यामुळे कुटुंबातील सदस्यांना या प्रक्रियेत कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करण्याची मुभा नसते.

ऑप्ट-आउट म्हणजे निवड रद्द करणे. ऑप्ट-आउट पॉलिसी मध्ये एखाद्याला मृत्यूनंतर अवयवदान करण्याची इच्छा नसेल तर त्याला तशी नोंदणी करावी लागते.

जोपर्यंत ही नोंदणी होत नाही, तोपर्यंत त्या व्यक्तीला मृत्यूनंतर संभाव्य दाता मानले जाते. सॉफ्ट ऑप्ट-आउट पॉलिसी बाबतीत सांगायचे झाले तर कुटूंबातील एखादा सदस्य अवयव दान करवूण घेण्यासाठी मृत व्यक्तिच्या वतीने निर्णय घेऊ शकतो, पण हार्ड ऑप्ट-आउट नोंदणी केल्यास कुटुंबातील सदस्यांनी आग्रह केला तरीही मृताच्या अवयवांचे दान केले जाऊ शकत नाही.


संशोधनाच्या आधारे असे निदर्शनास आले आहे की ऑप्ट-आउट पॉलिसी अंतर्गत केल्या जाणाऱ्या अवयवदानाचा दर सर्वात प्रभावी मानला जातो. वेल्स (Wales, Great Britain) मध्ये झालेल्या एका अध्ययनात असे दिसले की ऑप्ट-इन पॉलिसी स्थगित करुन ऑप्ट-आउट पॉलिसीचा अवलंब केल्यास अवयव प्रत्यारोपणाच्या दरात वाढ झाली. पण त्याचबरोबर असे ही म्हणटले जाते की ऑप्ट-आउट पॉलिसीचा सर्वच देशात असा सकारात्मक दर पहायला मिळालेला नाही.


बर्‍याच वेळा लोक ऑप्ट-आउट पॉलिसी बाबतीत अनभिज्ञ असतात आणि त्यामुळे या विषयावर कारवाई करीत नाही. ज्यामुळे संभाव्य अवयवदात्यांची संख्या जास्त असते आणि जास्त संख्येने सकारात्मक व कौटुंबिक संमती मिळते. या मनोवृत्तीच्या परीणाम म्हणूनच ऑप्ट-इन साठी कमी लोक त्यांची इच्छा दर्शवून नोंदणी करतात.


प्रो. इमॉन फर्ग्युसन यांनी त्यांच्या एका प्रकाशनात नमूद केल्याप्रमाणे, ऑप्ट-इन प्रक्रियेमध्ये (नोंदणी करण्याबाबत केलेल्या) निष्क्रियतेमुळे, ज्या व्यक्तींना अवयव दान देण्याची इच्छा आहे ते देऊ शकत नाही (मिथ्या नकार). याउलट, ऑप्ट-आउट प्रक्रियेमध्ये निष्क्रियतेमुळे अशी व्यक्ती जी दान देऊ इच्छित नाही, तिचे मृत्योपरांत अवयव दान केले जाते (मिथ्या होकार).


BMC (BioMed Central, U.K.) Medicine मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासातून असे निष्कर्ष मांडण्यात आले आहे की "ऑप्ट-आऊट संमतीमुळे मृत्योपरांत दानाचे प्रमाण वाढेल, मात्र जिवंतपणी होणाऱ्या अवयवदानाचे प्रमाण कमी होऊ शकते".अवयवदानाच्या दरात अव्वल देश प्रति दशलक्ष लोकसंख्येमध्ये

अवयवदान आणि प्रत्यारोपणाच्या क्षेत्रात जागतिक नेता ठरलेल्या 'स्पेन'कडे पाहता हे स्पष्ट होते की अल्प कालावधीत ऑप्ट-आउट पॉलिसी जरी प्रमाण वाढवण्यात प्रभावी ठरत असला तरी हे प्रमाण जास्त काळ टिकवून ठेवण्यासाठी सुस्थिती राखणारी, सुलभीकरण आणि वेळोवेळी सोपस्करण करणारी प्रणाली अंगिकारणेआवश्यक आहे. स्पेन ऑप्ट-आउट सिस्टमचा यशस्वीरित्या उपयोग करतोय, त्याचे श्रेय त्यांच्या कार्यपद्धतीतला वेगळेपणा म्हणजेच काळानुरूप बदललेल्या उपाययोजनाआणि धोरण यांना जातो. तसेच त्यांचे स्थानिक आणि राष्ट्रीय स्तरावरील कार्यकर्ते, त्यांचे दर्जेदार प्रशिक्षण आणि ऑनबोर्डिंग व त्यांचे सुजाण नागरीक अनुपमेय, असाधारण बनवते.


असे म्हटले जाते की, ऑप्ट-आउट पॉलिसी मृतांच्या अवयवदानाचे प्रमाण वाढवते परंतु ऑप्ट-आउट पॉलिसीमध्ये जिवीतांकडून होणाऱ्या अवयवदानाची संख्या जास्त असते. या व्यतिरीक्त लोकांच्या मनोवृत्ती वर परीणाम करणारे आणख़ी कोणता घटक/धोरण असू शकेल?


हा लेख जगभरात अवलंबल्या जाणार्‍या अवयवदान देण्याच्या पॉलिसीच्या प्रकारांची ओळख करून देण्यासाठी लिहिला गेला होता. येत्या रविवारी पुढील लेखात आम्ही भारतीय अवयवदान आणि प्रत्यारोपणाच्या प्रणालीबद्दल तसेच या अधिकाराच्या नियमांविषयी चर्चा करणार आहोत.

27 views0 comments

Comments


bottom of page