top of page

मेंदूचा मृत्यू आणि कौटुंबियांची संमतीमेंदूची मृतावस्था आणि मृत्यू :

मानवी अवयव आणि ऊतक प्रत्यारोपणाचे नियम, १९९४ च्या मते ‘मृत व्यक्ती’ म्हणजे अशी व्यक्ती जीने जगण्याच्या सर्व खुणा गमावल्या आहेत कारण-   
१) या अवस्थेत मेंदूच्या स्टेमची सर्व कार्ये कायमस्वरुपी आणि अपरिवर्तनीयपणे थांबतात
२) किव्हा थेट जन्मानंतर कोणत्याही वेळी हृदयविकाराचा झटका येणे

मेंदूची मृतावस्था ही जरी मृत्यू घोषित करण्याची संकल्पना असली तरी, भारतात ही कल्पना केवळ अवयवदानाबाबत वापरली जाते. मेंदूची मृतावस्था ही मूळ कल्पना यूके (UK) मधील आहे. अ‍मेरीकेत (US) एखाद्याला मृत घोषित करण्यासाठी व त्या मृत व्याक्तिला अवयवदाता घोषित करण्यासाठी त्या व्यक्तिचा मेंदू पुर्णपणे मृतावस्थेत असावे लागते.

भारतात मेंदूची मृत घोषित करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया असून ती विशिष्ट डॉक्टरांद्वारे(न्यूरोलॉजिस्ट, न्यूरोसर्जन, इंटिव्हालिस्ट (अतिदक्षता विभाग), अ‍ॅनेस्थेतीस्ट (भूल देणारे) आणि भारत सरकारद्वारे मान्यता प्राप्त एमडी स्तराचे चिकित्सक) पूर्ण केली जाते. 
त्या अंतर्गत दोन डॉक्टरस् वैयक्तिकरीत्या आणि स्वतंत्रपणे 6 तासांच्या अंतराने दोन भिन्न चाचणी घेतात. दुसरी चाचणी यशस्वी झाल्यास मृताच्या कुटूंबाकडे अवयवदानाबाबत संपर्क केला  जातो. प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ प्रा. राहुल पंडित यांनी त्यांच्या संशोधनात मेंदूचा मृत्यू आणि त्यांतर्गत भारतीय कायद्यानुसार अवयवदाना संबंधित कायदेशीर प्रक्रियेचा खुलासा केला आहे. दक्षिण-भारतात कर्यरत असलेल्या एका स्वयंसेवी संस्थेनेही मेंदूचा मृत्यू आणि संभाव्य अवयव दाता म्हणून घोषित करण्यासाठीची कार्यपद्धती आणि तपासणीची यादी याविषयी अतिदक्षता केंद्रातिल व्यक्ती तसेच सामान्य लोकांना देखिल प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे.

मेंदू मृत होण्याचे मुख्य कारणे:

१. कवटीत रक्तस्राव होणे

२. वाहन अपघात, औद्योगिक अपघात, बंदुकीच्या गोळ्यामुळे डोके दुखापत होणे

३. मस्तिष्क ला मार लगल्यामुळे रक्ताचा/ऑक्सिजन तुटवडा पडणे (अस्थमा, ह्दयविच्छेदन, प्रमाणा बाहेर औषधाचे सेवन केल्यामुळे, गळफास घेतल्यामुळे, कार्बन मोनोऑक्साइड, पाण्यात बुडणे, मेनिंजायटीस, विषबाधा किंवा प्राथमिक हृदयविकाराच्या कारणामुळे हृदयाचे कार्य थांबणे)

४. मेंदुतील गाठ (Primary cerebral tumor)

मेंदूचा मृत्यू जाहीर झाल्यास अवयव दानाच्या प्रक्रियेतील पुढील टप्पा म्हणजे कुटूंबाची संमती. जर एखाद्या व्यक्तीने आधीपासूनच अवयवदानासाठी नोंद केली असेल तर कुटूंबाची संमती घेऊन अवयव दानाची प्रक्रिया सुरु केली जाते. कौटुंबिक संमती ही या प्रक्रियेची सर्वात महत्वाची बाजू आहे आणि भारता समवेत इतर आनेक देशांमध्ये कमी अवयवदान दर असण्याचे हे सर्वात मोठे कारण आहे.


संमती प्रक्रियेसंदर्भातील नियम:
उघड संमती
जर एखाद्या व्यक्तिने त्याच्या/तिच्या जिवंतपणी अवयवदानाचा संकल्प केलेला असल्यास, मृत्यूनंतर त्याच्या/तिच्या अवयवदान करण्यासाठी जवळच्या नातेवाईकाकडून सल्ला घेणे आवश्यक आहे.
मान्य केलेली संमती
जर मृत व्यक्तीने कधीही त्याचे अवयव दान करण्यास नकार दिलेला नसल्यास त्याच्या जवळच्या नातलगांकडून त्याच्या/तिच्या अवयवदाना सम्बंधित सकारात्मक संमती मिळविणे आवश्यक आहे.
नातेवाईकांचा नकाराधिकार
 मृत व्यक्तीच्या उघड संमती नसल्यास, नातेवाईकांना अवयव दानाची संमती किंवा नकार देण्यास पूर्ण अधिकार आहे.
जवळच्या कुटुंब सदस्याचा अनुक्रम खालीलप्रमाणे आहे;
नेमलेला प्रतिनिधी;
नवरा / बायको;
पालक / मूल ;
भाऊ / बहिण;
आजी-आजोबा / नातवंड;
भाचा-भाची / पुतणा-पुतणी;
सावत्र-पालक;
सावत्र-भाऊ / सावत्र-बहीण;
दूरचा मित्र.

अवयवदान जनजाग्रुती मालिकेचा हा तिसरा लेख आहे, पुढील लेखात भारतासारख्या देशांमध्ये कौटुंबिक संमती अथवा नकार या घटकांवर लक्ष केंद्रित केले जाईल.

32 views0 comments

Comments


bottom of page