top of page

Bharat Ganeshpure donated the eyes of his mother Late Manorama Ganeshpure

Updated: Mar 13, 2023

स्व. श्रीमती मनोरमा त्र्यंबकराव गणेशपुरे यांचे दिशा इंटरनॅशनल आय बँक मध्ये नेत्रदान महाराष्ट्र मधील सुप्रसिद्ध कलाकार श्री भारत गणेशपुरे व श्री संजय गणेशपुरे यांच्या मातोश्री स्व. श्रीमती मनोरमा त्र्यंबकराव गणेशपुरे यांचे दिनांक ९ मार्च २०२३ रोजी दुःखद निधन झाले. मृतुप्रंत दिशा ग्रुपचे संस्थापक सचिव श्री स्वप्निल अरुण गावंडे व मुंबई मधील प्रख्यात दिग्दर्शक श्री विराग वानखेडे यांनी गणेशपुरे परिवाराला नेत्रदान करिता प्रेरित केले.


कुटूंबातील व्यक्तीच्या निधनामुळे कुटूंबियांना दुःख होणे स्वाभाविक असते. गणेशपुरे परिवारावर सुद्धा दुःखाचा डोगर कोसळले परंतु अशाही परिस्तिथीत गरजूंना या जगातील रंग पाहता येतील या उद्दात भावनेने गणेशपुरे परिवाराच्या सदस्यांनी स्व. श्रीमती मनोरमा त्र्यंबकराव गणेशपुरे यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला व अमरावती मधील दिशा ग्रुप व दिशा एज्युकेशन फाऊंडेशन द्वारा संचालित दिशा इंटरनॅशनल आय बँक या धर्मदाय नेत्रपेढीला नेत्रदानाची संमती दिली. दिशा ग्रुपचे सचिव श्री स्वप्निल अरुण गावंडे, दिशा इंटरनॅशनल आय बँकेचे मेडिकल डिरेक्त्तर डॉ मनिष बबन तोटे, श्री हिमांशू प्रमोद बंड, श्री अंकुश आंबेडकर यांनी मरणोत्तर नेत्रकमळ दान करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली.


नेत्रदानाचे पवित्र कार्य केलाबद्दल दिशा एजुकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या अध्यक्षा सौ. कुंदा अरुण गावंडे व सचिव स्वप्निल अरुण गावंडे द्वारे गणेशपुरे कुटुंबियांचे आभार व्यक्त करण्यात आले. गणेशपुरे परीवाला नेत्रदाना केल्या बद्दल मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा अंतर्गत नेत्रदानाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या सेवाभावी कार्यात गणेशपुरे पररिवारातील सौ स्मिता संजय गणेशपुरे, सौ अर्चना भारत गणेशपुरे, श्री पंकज मोंढे, श्री गजानन जुनघरे व इतर सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. दिशा ग्रुप व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या सर्व संचालक मंडलाने व कार्यकर्त्यां तर्फे स्व. श्रीमती मनोरमा त्र्यंबकराव गणेशपुरे यांना श्रद्धांजली अर्पित करणात आली.


भारतासमोर अंधत्व हि फार मोठी समस्या उभी आहे. एक व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन कॉर्नियल अंधांना दृष्टी प्राप्त होऊ शकते. उच्च रक्तदाब, मधुमेह, अस्थमा इत्यादी आजार असलेले व्यक्तीचे देखील नेत्रदान केले जाऊ शकते. चष्मा असलेले व मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेल्या व्यक्तीचे सुध्दा नेत्रदान केले जाऊ शकते. मृत्यू नंतर नेत्रदानासाठी काही काळजी घेणे गरजेचे आहे जसे मृत्यू नंतर सहा ते आठ तसा पर्येंत नेत्रदान केला जाऊ शकते. त्यामुळे मृत्युपच्यात ताबडतोप दिशा इंटरनॅशनल आय बँकेला संपर्क करावा. मृत व्यक्तीचे डोळे उघडे असल्यास ते बंद करावे व त्यावर ओले कापसाचे बोळे ठेवावे. मृत व्यक्तीच्या डोक्या खाली २ उश्या ठेवावा. पंखा बंद ठेवावा. ए.सी असेल तर सुरु ठेऊ शकता. व मृत्यूच्या करणाचे वैद्यकीय प्रमाणपत्र डॉक्टरान कडून घेऊन घ्यावे. मारनोतर नेत्रदानासाठी संपर्क करा दिशा इंटरनॅशनल आय बँक,यशोदा नगर अमरावती. मो. 9899898667, 8275539754, 7378656145 किवा स्वप्नील अरुण गावंडे - 9423424450. ऑनलाईन नेत्रदानाचा संकल्प करण्यासाठी भेट द्या www.deeshagroup.org



567 views0 comments

Comments


bottom of page