Correcting the eyesight of 131 Citizens in Dhanaj Bk. through the Mobile Eye Care Unit of Deesha Group Amravati
- anildeshmukh
- Dec 19, 2024
- 2 min read
दिशा ग्रुपच्या फिरते नेत्र चिकिसालय द्वारा
धनज बु. पोलीस स्टेशन मध्ये १३१ नागरिकांची नेत्र तपासणी
दिशा एज्युकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँक द्वारा ग्रामीण व दुर्गम भागात नेत्र चिकित्सा फिरते नेत्र चिकित्सालय द्वारे उपलब्ध करून दिली आहे. या फिरत्या नेत्र चिकिसालय द्वारा वाशिम जिल्हा मधील धनज बु. या गावातील पोलीस स्टेशन येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये जेष्ठ नागरिक व मुलांचे मोफत नेत्र तपासणी करण्यात आली.

कार्यक्रमाचे उद्घाटक पोलीस अधिक्षक वाशिम मा. श्री. अनुज तारे साहेब व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आय बँक असोसिएशन ऑफ इंडिया पश्चिम विभागाचे चेअरपर्सन श्री. स्वप्नील अरुण गावंडे हे उपस्थित होते. या नेत्र तपासणी शिबिरामध्ये एकूण १३१ नागरिकांची तपासणी करण्यात आली या मध्ये ज्येष्ठ, पुरुष, महिला, मुले याची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. या नेत्रतपासणी मध्ये चष्म्याचे नंबर काढून देण्यात आले. आपण आपल्या डोळ्याची कश्या प्रकारे काळजी घेऊ शकतो याचे मार्गदर्शन करण्यात आले. बहुतांश जेष्ठ नागरिकांच्या नेत्र तपासणी मध्ये मोतियाबिंदू व टेरेजियम आजार आढळून आले. जेष्ठाना असलेल्या मोतियाबिंदू च्या ऑपरेशन संबधी समुपदेशन करण्यात आले. यातील काही रुग्णांना पुढील तपासणीसाठी स्थानिक धर्मदाय नेत्र रुग्णालय मध्ये पाठवण्यात येणार आहे. दिशा ग्रुपच्या युवा कार्यकर्त्यांनी नागरिकांना नेत्रदानाची माहिती देऊन त्याबद्दलचे गैर समज दूर केले.
या नेत्र तपासणी शिबिराच्या आयोजन करीत दिशा ग्रुपचे श्री. स्वप्नील अरुण गावंडे, डॉ. श्रध्दा ढाकुलकर, ऑप्थल्मिक ऑफिसर कु. प्रणाली चांभारे, श्री. हिमांशू बंड, श्री. अनिल देशमुख, तसेच धनज बु. चे ठाणेदार श्री. संजय खंडारे सर व पोलिस स्टेशन च्या इतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.
भारतासमोर अंधत्व हि फार मोठी समस्या उभी आहे. एक व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन कॉर्नियल अंधांना दृष्टी प्राप्त होऊ शकते. उच्च रक्तदाब, मधुमेह, अस्थमा इत्यादी आजार असलेले व्यक्ती देखील नेत्रदान करू शकतात. चष्मा असलेले व मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेल्या व्यक्तीचे सुध्दा नेत्रदान केले जाऊ शकते.
Comments