राजूरवाडी मध्ये १५० नागरिकांची नेत्र तपासणी दिशा ग्रुपच्या फिरते नेत्र चिकिसालय द्वारा करण्यात आली
दिशा एज्युकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँक द्वारा ग्रामीण व दुर्गम भागात नेत्र चिकित्सा फिरते नेत्र चिकित्सालय द्वारे उपलब्ध करून दिली आहे. या फिरत्या नेत्र चिकिसालय द्वारा अमरावती जिल्हा मधील राजूरवाडी या गावामधील श्री कृष्ण अवधूत महाराज मंदिर येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये जेष्ठ नागरिक व मुलांचे मोफत नेत्र तपासणी करण्यात आली.

या नेत्र तपासणी शिबिरामध्ये एकूण १५० नागरिकांची तपासणी करण्यात आली ज्यामध्ये १४४ जेष्ठ नागरिकांची तर ६ मुल होती. बहुतांश जेष्ठ नागरिकांच्या नेत्र तपासणी मध्ये मोतियाबिंदू व टेरेजियम आजार आढळून आले. या सोबतच डोळ्यातील सर्वात बाहेरील पारदर्शक भाग कॉर्निया त्याची पारदर्शकता हळू हळू कमी होते व व्यक्तीला दिसणे बंद होते. यालाच वैद्यकीय भाषेत कॉर्नियल ऑपॅसिटी असे म्हणतात. कॉर्नियल ऑपॅसिटी असलेला व्यक्ती सुद्धा या शिबिरा मध्ये आढळून आला. अश्या प्रकारचे अंधत्व्य दूर करण्या साठी एकमेव मार्ग असतो. नेत्रदान झालेला पारदर्शक कॉर्निया हा त्या व्यक्तीला प्रत्यारोपण द्यारा बसवल्या जाऊन त्या व्यक्तीची दुष्टी वाचवल्या जाऊ शकते. या सर्वांना पुढील तपासणी साठी स्थानिक धर्मदाय नेत्र रुग्णालय मध्ये पाठवण्यात येणार आहे.
या नेत्र तपासणी शिबिराच्या आयोजन करीत श्री विठ्ठल राव मानकर, श्री रंगराव अडेकर, श्री प्रमोद मोडक, श्री मुरली खडसे, श्री निखिल मानकर तसेच दिशा ग्रुपचे श्री स्वप्नील अरुण गावंडे, श्री हिमांशू बंड, श्रीमती भारती तसरे, श्री मोहम्मद नावेद आदी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.
एक व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन कॉर्नियल अंधांना दृष्टी प्राप्त होऊ शकते. उच्च रक्तदाब, मधुमेह, अस्थमा इत्यादी आजार असलेले व्यक्ती देखील नेत्रदान करू शकतात. चष्मा असलेले व मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेल्या व्यक्तीचे सुध्दा नेत्रदान केले जाऊ शकते. मृत्यू नंतर नेत्रदानासाठी काही काळजी घेणे गरजेचे आहे जसे मृत्यू नंतर सहा ते आठ तसा पर्येंत नेत्रदान केला जाऊ शकते. त्यामुळे मृत्युपच्यात ताबडतोप दिशा इंटरनॅशनल आय बँकेला संपर्क करावा. मृत व्यक्तीचे डोळे उघडे असल्यास ते बंद करावे व त्यावर ओले कापसाचे बोळे ठेवावे. मृत व्यक्तीच्या डोक्या खाली २ उश्या ठेवावा. पंखा बंद ठेवावा. ए.सी असेल तर सुरु ठेऊ शकता. व मृत्यूच्या करणाचे वैद्यकीय प्रमाणपत्र डॉक्टरान कडून घेऊन घ्यावे.
Comments