स्व. श्रीमती कुसुम लबडे यांचे दिशा इंटरनॅशनल आय बँक मध्ये नेत्रदान
लबडे परीवाला देण्यात आले मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा अंतर्गत नेत्रदानाचे प्रमाणपत्र
श्रीराम नगर, अमरावती येथील रहिवासी स्व. श्रीमती कुसुम मधुकरराव लबडे यांचे दुःखद निधन झाले. लबडे परिवाराने दुःखाचा डोगर बाजूला सावरून अशाही परिस्तिथीत गरजूंना या जगातील रंग पाहता येतील या उद्दात भावनेने लबडे परिवाराच्या सदस्यांनी स्व. श्रीमती कुसुम मधुकरराव लबडे यांचा नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला व अमरावती मधील दिशा ग्रुप द्वारा संचालित दिशा इंटरनॅशनल आय बँक या धर्मदाय नेत्र पेढीला संपर्क केला. दिशा इंटेरनॅशनल आय बँकेचे मेडिकल डायरेक्टर डॉ. मनीष तोटे, श्री हिमांशू बंड, सचिव श्री स्वप्निल अरुण गावंडे यांनी मरणोत्तर नेत्रकमळ दान करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली.
या सेवाभावी कार्यात परिवारातील श्री सुनील लबडे, श्री मिलिंद लबडे, श्री मनीष गणेशपुरे व लबडे परिवारातील इतर सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. लबडे परीवाला नेत्रदान केल्या बद्दल मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा अंतर्गत नेत्रदानाचे प्रमाणपत्र देण्यात आले. नेत्रदानाचे पवित्र कार्य केलाबद्दल दिशा एजुकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या सर्व संचालक मंडळाने व कार्यकर्त्यांतर्फे लबडे कुटुंबियांचे आभार व्यक्त करण्यात आले व स्व. श्रीमती कुसुम मधुकरराव लबडे यांना श्रद्धांजली अर्पित करणात आली.
भारतासमोर अंधत्व हि फार मोठी समस्या उभी आहे. एक व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन कॉर्नियल अंधांना दृष्टी प्राप्त होऊ शकते. उच्च रक्तदाब, मधुमेह, अस्थमा इत्यादी आजार असलेले व्यक्तीचे देखील नेत्रदान केले जाऊ शकते. चष्मा असलेले व मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेल्या व्यक्तीचे सुध्दा नेत्रदान केले जाऊ शकते. मृत्यू नंतर नेत्रदानासाठी काही काळजी घेणे गरजेचे आहे जसे मृत्यू नंतर सहा ते आठ तासा पर्येंत नेत्रदान केला जाऊ शकते. त्यामुळे मृत्युपच्यात ताबडतोप दिशा इंटरनॅशनल आय बँकेला संपर्क करावा. मृत व्यक्तीचे डोळे उघडे असल्यास ते बंद करावे व त्यावर ओले कापसाचे बोळे ठेवावे. मृत व्यक्तीच्या डोक्या खाली २ उश्या ठेवावा. पंखा बंद ठेवावा. ए.सी असेल तर सुरु ठेऊ शकता. व मृत्यूच्या करणाचे वैद्यकीय प्रमाणपत्र डॉक्टरान कडून घेऊन घ्यावे.
Comments