जागतिक महिला दीनानिमित्य आयोजित नेत्रतपासणी शिबिरा मध्ये १०१ महिलांची नेत्र तपासणी
दिशा ग्रुपच्या फिरते नेत्र चिकिसालय द्वारा करण्यात आली
सर्वच क्षेत्रांमध्ये आघाडीवर असणाऱ्या महिला स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करताना दिसतात. स्त्री ही कुटुंबाचा आधारस्तंभ असते व तिच्यामुळे कुटुंब ताठपणे उभे राहते. याच विचारातून महिलादिनाचे औचित्य साधून दिशा एज्युकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँक व बघेरवाल महिला मैत्री मंडळ द्वारा या नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन वाशीम जिल्हा मधील कारंजा (लाड) येथील सन्मती भवन येथे करण्यात आले होते. या शिबिरामध्ये महिलांची व मुलींची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली.
या नेत्र तपासणी शिबिरामध्ये एकूण १०१ महिलांची व मुलांची मोफत नेत्रतपासणी करून देण्यात अली. याप्रसंगी बघेरवाळ मैत्री महिला मंडळचा अध्यक्षा चित्रा मिश्रीकोटकर, कल्याणी चवरे, डॉ. निकिता दानखेडे, डॉ. दीपिका काटोले, डॉ. साधना भिसिकर, काजल गोलेच्छा, डॉ. कविता मिसाळ, गुंजन चवरे आदिंची व्यासपिठावर उपस्थिती होती. या नेत्रतपासणी मध्ये चष्म्याचे योग्य नंबर काढून देण्यात आले. बहुतांश जेष्ठ महिलांना नेत्र तपासणी मध्ये मोतियाबिंदू व टेरेजियम आजार आढळून आले. महिलांना असलेल्या मोतियाबिंदू च्या ऑपरेशन संबधी समुपदेशन करण्यात आले. यातील काही रुग्णांना पुढील तपासणी साठी स्थानिक धर्मदाय नेत्र रुग्णालय मध्ये पाठवण्यात येणार आहे. दिशा ग्रुपच्या युवा कार्यकर्त्यांनी नागरिकांना नेत्रदानाची माहिती देऊन त्याबद्दलचे गैर समज दूर केले.
या नेत्र तपासणी शिबिराच्या आयोजन करीत बघेरवाल महिला मैत्री मंडळ, बघेरवाळ संघ शाखा चे अध्यक्षा व संस्थेच्या इतर पदाधिकाऱ्यानी तसेच दिशा ग्रुपचे श्री स्वप्नील अरुण गावंडे, श्री हिमांशू बंड, श्रीमती भारती तसरे, श्री मोहम्मद नावेद आदी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.
Comments