top of page

"The Life-Changing Impact of Ashok Chaware's Eye Donation: Inspiring Others to Give the Gift of Sight"

स्व. श्री. अशोक प्रभाकर चवरे यांचे मरणोत्तर नेत्रदान


चवरे लाईन कारंजा येथील रहिवासी स्व. श्री. अशोक (राजाभाऊ) प्रभाकर चवरे यांचे 5 ऑगस्ट 2024 रोजी ला वयाच्या 66 व्या वर्षी दुःखद निधन झाले. निधनानंतर चवरे कुटुंबाने आपल्यावरील दुःखाचा डोंगर बाजुला सावरून पत्नी मीनाताई चवरे, व मुलगा श्री. अर्चित चवरे, सौ. रेखाताई भ. संगई, श्रीमती मंगला मिश्रीकोटकर यांनी गरजूंना या जगातील रंग पाहता यावे या उदात्त भावनेने नेत्रदानाचा निर्णय घेतला. अमरावती येथील दिशा इंटरनॅशनल आय बँक या धर्मदाय नेत्रपेढीला प्राचार्य उदय नांदगावकर यांनी संपर्क केला. दिशा इंटरनॅशनल आय बँकेचे सचिव श्री. स्वप्निल अरुण गावंडे, श्री. हिमांशू बंड व श्री. अनिल देशमुख यांनी मरणोत्तर नेत्रकमळ दान करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली.

चवरे कुटुंबीयांनी स्व. श्री. अशोक प्रभाकर चवरे यांचे नेत्रकलम दिशा इंटरनॅशनल आय बँकेला सुपूर्त केले.
चवरे कुटुंबीयांनी स्व. श्री. अशोक प्रभाकर चवरे यांचे नेत्रकलम दिशा इंटरनॅशनल आय बँकेला सुपूर्त केले.

नेत्रदानाचे पवित्र कार्य केल्याबद्दल दिशा एजुकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या अध्यक्षा सौ. कुंदा अरुण गावंडे व श्री. सचिव स्वप्निल अरुण गावंडे द्वारे चवरे कुटुंबियांचे आभार व्यक्त करणात आले. चवरे परीवाला नेत्रदान केल्याबद्दल मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा अंतर्गत नेत्रदानाचे प्रमाणपत्र देण्यात आले. या सेवाभावी कार्यात चवरे परिवारातिल श्रीमती शांताबाई चवरे, श्री. सुहास चवरे, सौ अनु चवरे व चवरे परिवारातील इतर सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

नेत्रदाता स्व. श्री. अशोक प्रभाकर चवरे
नेत्रदाता स्व. श्री. अशोक प्रभाकर चवरे

यावेळी दिशा ग्रुप कारंजाचे डॉ. शार्दूल डोंणगावकर, डॉ. विजय जवाहरमलानी, डॉ. सुशील देशपांडे, शेखर बंग, परमेश्वर व्यवहारे, प्रफुल्ल वानखडे, प्रज्वल गुलालकरी, परिवारातील सदस्य रविसावजी चवरे, श्रेयांससावजी चवरे, सुरेश नांदगावकर, दिपक नांदगावकर व परिवारातील अनेक सदस्य उपस्थित होते. नेत्रदानाच्या सेवाभावी कार्यासाठी परिवारातील इतर सदस्यांचे देखील मोलाचे सहकार्य लाभले. दिशा ग्रुप व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या सर्व संचालक मंडळ व कार्यकर्त्यांतर्फे स्व. श्री.अशोक प्रभाकर चवरे यांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.


भारतासमोर अंधत्व हि फार मोठी समस्या उभी आहे. एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन कॉर्नियल अंधांना दृष्टी प्राप्त होऊ शकते. उच्च रक्तदाब, मधुमेह, अस्थमा असे आजार असलेल्या व्यक्तीचे देखील नेत्रदान केले जाऊ शकते . तसेच चष्मा असलेले व मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेल्या व्यक्तीचे सुध्दा नेत्रदान केले जाऊ शकते. मृत्यूनंतर सहा ते आठ तासापर्यंत नेत्रदान केले जाऊ शकते. त्यामुळे मृत्युनंतर ताबडतोब दिशा इंटरनॅशनल आय बँकेला संपर्क करावा. मृत व्यक्तीचे डोळे उघडे असल्यास ते बंद करावे व त्यावर ओले कापसाचे बोळे ठेवावे. मृत व्यक्तीच्या डोक्याखाली २ उशा ठेवाव्या आणि पंखा बंद ठेवावा तसेच ए.सी. असेल तर सुरु ठेऊ शकता.

Comments


bottom of page