A Legacy of Compassion: Eye Donation of Late Shree Satish Niranjan Bhalchakra (47 years old)
स्व. श्री. सतीश निरंजन भालचक्र (वय ४७) यांचे मरणोत्तर
दिशा इंटरनॅशनल आय बँक मध्ये नेत्रदान
टाकरखेडा शंभू, ता. भातकुली, जि. अमरावती येशील रहिवासी स्व. श्री. सतीश निरंजन भालचक्र (वय ४७) यांचे दुःखद निधन झाले. भालचक्र परिवारावर दुःखाचा डोगर कोसळले, परंतु अशाही परिस्थितीत पत्नी श्रीमती प्रविणा भालचक्र यांनी स्व. श्री. सतीश निरंजन भालचक्र यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. दिशा ग्रुप व दिशा एज्युकेशन फाऊंडेशन द्वारा संचालित दिशा इंटरनॅशनल आय बँक या धर्मदाय नेत्रपेढीचे सचिव श्री स्वप्निल अरुण गावंडे, दिशा आय बँकेचे डेप्युटी मेडिकल डिरेक्त्तर डॉ अंकित हरवानी, श्री हिमांशू प्रमोद बंड, श्री अनिल सदाशिवराव देशमुख यांनी मरनोतर नेत्रकमळ दान करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली.

नेत्रदानाचे पवित्र कार्य केल्याबद्दल दिशा एज्युकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या संचालक मंडळाद्वारे भालचक्र कुटुंबियांचे आभार व्यक्त करणात आले. भालचक्र परीवाराला नेत्रदान केल्या बद्दल मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा अंतर्गत नेत्रदानाचे प्रमाणपत्र देण्यात आले. या सेवाभावी कार्यात भालचक्र परिवारातील श्री. चेतन भालचक्र, श्री. आदेश भालचक्र, श्री. नंदू भालचक्र तसेच परिवारातील इतर सदस्यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. दिशा ग्रुप व दिशा इंटरनॅशनल आय बँकेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी स्व. श्री. सतीश निरंजन भालचक्र यांना श्रद्धांजली अर्पण केली.
भारतामध्ये कॉर्नियल अंधत्व ही गंभीर समस्या बनत चालली आहे. एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन अंध व्यक्तींना दृष्टी मिळू शकते. विशेष म्हणजे उच्च रक्तदाब, मधुमेह, दमा, चष्मा असणे किंवा मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेले असले तरीही नेत्रदान करता येते. मृत्यूनंतर सहा ते आठ तासांच्या आत नेत्रदान केले जाऊ शकते.
मृत्यूनंतर तात्काळ डोळे बंद करून त्यावर ओले कापसाचे बोळे ठेवावेत, डोक्याखाली दोन उशा ठेवाव्यात आणि पंखा बंद ठेवावा. ए.सी. सुरू ठेवला तरी चालतो. त्यामुळे मृत्युनंतर ताबडतोब दिशा इंटरनॅशनल आय बँकेला संपर्क करावा.
नेत्रदानासाठी संपर्क: 9899898667 | 7378656145




Comments