दिशा ग्रुपच्या फिरते नेत्र चिकित्सालयाद्वारे आडनदीच्या शासकीय आश्रमशाळेत नेत्र तपासणी शिबिर
- Pranali Chambhare
- 6 hours ago
- 1 min read
चिखलदरा | दिनांक: १९ ऑगस्ट २०२६
दुर्गम भागातील विद्यार्थ्यांपर्यंत नेत्रसेवा पोहोचवण्याच्या उद्देशाने दिशा ग्रुपच्या फिरते नेत्र चिकित्सालयाच्या माध्यमातून चिखलदरा तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा, आडनदी येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात शाळेतील एकूण १९३ विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली.

शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांची दृष्टी तपासणी तसेच आवश्यक प्राथमिक नेत्र तपासणी करण्यात आली. विद्यार्थ्यांना डोळ्यांची योग्य काळजी, नियमित नेत्र तपासणी आणि दृष्टीदोषांकडे वेळीच लक्ष देण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. पुढील तपासणीची आवश्यकता असलेल्या विद्यार्थ्यांना त्याबाबत योग्य सल्ला देण्यात आला.
दिशा ग्रुपच्या टीमने विद्यार्थ्यांशी संवाद साधत तपासणीसोबतच नेत्र आरोग्याबाबत आवश्यक माहिती दिली. शिबिराच्या आयोजनासाठी शासकीय आश्रमशाळेचे प्राचार्य श्री. योगेश साहेबराव रोकडे, अधिक्षक श्री. पवन मोटेवार व सर्व शिक्षकवृन्द यांचे सहकार्य लाभले.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. दुर्गम भागातील शाळांमध्ये अशा प्रकारच्या नेत्र तपासणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या दृष्टीशी संबंधित समस्या वेळेत लक्षात येण्यास मदत होत आहे.
During Screening at School Mobile Eye Care Unit at Ashram School During Eye Checkup
दिशा ग्रुपचे फिरते नेत्र चिकित्सालय ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिक व विद्यार्थ्यांपर्यंत नेत्रसेवा पोहोचवण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे.




Comments