top of page

An eye checkup camp at Ghatladki

Updated: May 25, 2023

दिशा ग्रुपच्या फिरते नेत्र चिकिसालय द्वारा

घाटलाडकी, तालुका चांदुर बाजार मध्ये ८६ नागरिकांची नेत्र तपासणी

सत्यशोधक बहुउद्देशीय संस्थे द्वारे मात्रोश्री श्रीमती इंदुबाई बाबाराव कडू यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजन


दिशा एज्युकेशन फाऊंडेशन, दिशा इंटरनॅशनल आय बँक व सत्यशोधक बहुउद्देशीय संस्थे द्वारे मात्रोश्री श्रीमती इंदुबाई बाबाराव कडू यांच्या स्मृती प्रित्यर्थ फिरत्या नेत्र चिकिसालय द्वारा अमरावती जिल्हा मधील घाटलाडकी, तालुका चांदुर बाजार या गावामध्ये या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये जेष्ठ नागरिक व मुलांचे नेत्र तपासणी करण्यात आली.या नेत्र तपासणी शिबिरामध्ये एकूण ८६ नागरिकांची तपासणी करण्यात आली. या नेत्रतपासणी मध्ये चष्म्याचे योग्य नंबर काढून देण्यात आले. आपण आपल्या डोळ्याची कश्या प्रकारे काळजी घेऊ शकतो या साठी मार्गदर्शन करण्यात आले. बहुतांश जेष्ठ नागरिकांच्या नेत्र तपासणी मध्ये मोतियाबिंदू आजार आढळून आले. जेष्ठाना असलेल्या मोतियाबिंदू च्या ऑपरेशन संबधी समुपदेशन करण्यात आले. या सोबतच कॉर्नियल ऑपॅसिटी असलेला व्यक्ती सुद्धा या शिबिरा मध्ये आढळून आले. यातील काही रुग्णांना पुढील तपासणीसाठी स्थानिक धर्मदाय नेत्र रुग्णालय मध्ये पाठवण्यात येणार आहे. दिशा ग्रुपच्या युवा कार्यकर्त्यांनी नागरिकांना नेत्रदानाची माहिती देऊन त्याबद्दलचे गैर समज दूर केले.या नेत्र तपासणी शिबिराच्या आयोजन करीत श्री सागर वासनकर, श्री तुषार लंगडे, श्री अनंत जोग, शमशोद्दीन शाह तसेच दिशा ग्रुपचे श्री स्वप्नील अरुण गावंडे, श्री हिमांशू बंड, श्रीमती भारती तसरे, मोहम्मद नावेद आदी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.26 views0 comments

Comments


bottom of page