top of page

A Legacy of Compassion: Eye Donation of Late Smt. Vanita Arvind Umalkar

Updated: 21 hours ago

स्व. श्रीमती कोकू उर्फ वनिता अरविंद उमाळकर यांचे दिशा इंटरनॅशनल आय बँक मध्ये नेत्रदान


मेहेकर, जिल्हा बुलढाणा: श्री अजय उमाळकर यांच्या मातोश्री स्व. श्रीमती कोकू उर्फ वनिता अरविंद उमाळकर यांचे दिनांक १३ मार्च २०२६ रोजी दुःखद निधन झाले. उमाळकर परिवाराने या दुःखद प्रसंगात देखील सामाजिक जाणीव लक्षात घेऊन गरजूंना या जगातील रंग पाहता येतील या उद्दात भावनेने त्यांच्या मातोश्री स्व. श्रीमती वनिता अरविंद उमाळकर यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. नगर परिषद खामगांव व दिशा एज्युकेशन फाऊंडेशन अमरावती द्वारा संचालित नेत्र संकलन केंद्र खामगांव मध्ये त्यांचे नेत्रदान करण्यात आले. हे नेत्र संकलन केंद्र दिशा एज्युकेशन फाऊंडेशन अमरावती द्वारे संचालित दिशा इंटरनॅशनल आय बँक, अमरावती सोबत संलग्नित आहे. दिशा इंटरनॅशनल आय बँकेचे श्री हिमांशू प्रमोद बंड, श्री अनिल सदाशिवराव देशमुख यांनी मरणोत्तर नेत्रकमळ दान करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली.


Umalkar Family donated the eyes of Late Vanita Arvind Umalkar in Deesha International Eye Bank
Umalkar Family donated the eyes of Late Vanita Arvind Umalkar in DEF's Deesha International Eye Bank

नेत्रदानाचे पवित्र कार्य केलाबद्दल दिशा एजुकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या सचिव श्री. स्वप्निल अरुण गावंडे व नेत्र संकलन केंद्र खामगांवचे मेडिकल डिरेक्टर डॉ. आनंद झुनझुनवाला, डॉ. गौरव गोयंका, श्री. बिपीन गांधी द्वारे उमाळकर कुटुंबियांचे आभार व्यक्त करणात आले. या सेवाभावी कार्यात उमाळकर परिवारातिल श्री. अजय उमाळकर, श्री. पवन राठी, श्री गणेश महाजन, श्री. विलास चांकोरे व उमाळकर परिवारातील इतर सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. दिशा ग्रुप व दिशा इंटरनॅशनल आय बँक व नेत्र संकलन केंद्र खामगांवच्या सर्व संचालक मंडळ व कार्यकर्त्यां तर्फे स्व. श्रीमती कोकू उर्फ वनिता अरविंद उमाळकर यांना श्रद्धांजली अर्पित करणात आली.

 

Late Vanita Umalkar
Late Smt Vanita Umalkar

भारतासमोर बुबुळामुळे अंधत्व हि फार मोठी समस्या उभी आहे. एक व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन कॉर्नियल अंधांना दृष्टी प्राप्त होऊ शकते. उच्च रक्तदाब, मधुमेह, अस्थमा इत्यादी आजार असलेले व्यक्तीचे  देखील नेत्रदान केले जाऊ शकते. चष्मा असलेले व मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेल्या व्यक्तीचे सुध्दा नेत्रदान केले जाऊ शकते. मृत्यू नंतर नेत्रदानासाठी काही काळजी घेणे गरजेचे आहे जसे मृत्यू नंतर सहा ते आठ तसा पर्येंत नेत्रदान केला जाऊ शकते. त्यामुळे मृत्युपच्यात ताबडतोप दिशा इंटरनॅशनल आय बँकेला संपर्क करावा. मृत व्यक्तीचे डोळे उघडे असल्यास ते बंद करावे व त्यावर ओले कापसाचे बोळे ठेवावे. मृत व्यक्तीच्या डोक्या खाली २ उश्या ठेवावा. पंखा बंद ठेवावा. ए.सी असेल तर सुरु ठेऊ शकता. व मृत्यूच्या करणाचे वैद्यकीय प्रमाणपत्र डॉक्टरान कडून घेऊन घ्यावे.


मरणोत्तर नेत्रदानासाठी संपर्क करा:

7378656145, 9899898667



Comments


bottom of page