top of page

'Deesha International Eye Bank' Amravati – A message of humanity through the eye donation of a 20-year-old boy.

anildeshmukh
23 hours ago
1 min read

“मुलाच्या आठवणी जपल्या डोळ्यांतून;

२० वर्षीय मुलाचे वडिलांकडून मरणोत्तर नेत्रदान”


रामपुरी कॅम्प, अमरावती येशील रहिवासी स्व. श्री. जतीन विजयकुमार वरंदानी (वय २०) यांचे दुःखद निधन झाले. वरंदानी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळले, परंतु अशाही परिस्थितीत वडील श्री. विजयकुमार वरंदानी यांनी आपला मुलगा स्व. श्री. जतीन विजयकुमार वरंदानी (वय २०) यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. दिशा ग्रुप व दिशा एज्युकेशन फाऊंडेशन द्वारा संचालित दिशा इंटरनॅशनल आय बँक या धर्मदाय नेत्रपेढीने मरणोत्तर नेत्रकमळ दान करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली.


Warandani Family donated the eyes of Late Jatin Vijaykumar Warandani in Deesha International Eye Bank, Amravati
Warandani Family donated the eyes of Late Jatin Vijaykumar Warandani in Deesha International Eye Bank, Amravati

नेत्रदानाचे पवित्र कार्य केल्याबद्दल दिशा एज्युकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या संचालक मंडळाद्वारे वरंदानी कुटुंबियांचे आभार व्यक्त करण्यात आले. वरंदानी परीवाराला नेत्रदान केल्याबद्दल मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा अंतर्गत नेत्रदानाचे प्रमाणपत्र देण्यात आले. या सेवाभावी कार्यात वरंदानी परिवारातील श्री. आशिष लुल्ला, श्री. अंकुश नावानी तसेच वरंदानी परिवारातील इतर सदस्यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. दिशा ग्रुप व दिशा इंटरनॅशनल आय बँकेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी स्व. श्री. जतीन विजयकुमार वरंदानी यांना श्रद्धांजली अर्पण केली.


Late Jatin Warandani
Late Jatin Warandani

भारतामध्ये कॉर्नियल अंधत्व ही गंभीर समस्या बनत चालली आहे. एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन अंध व्यक्तींना दृष्टी मिळू शकते. विशेष म्हणजे उच्च रक्तदाब, मधुमेह, दमा, चष्मा असणे किंवा मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेले असले तरीही नेत्रदान करता येते. मृत्यूनंतर सहा ते आठ तासांच्या आत नेत्रदान केले जाऊ शकते.


मृत्यूनंतर तात्काळ डोळे बंद करून त्यावर ओले कापसाचे बोळे ठेवावेत, डोक्याखाली दोन उशा ठेवाव्यात आणि पंखा बंद ठेवावा. ए.सी. सुरू ठेवला तरी चालतो. त्यामुळे मृत्युनंतर ताबडतोब दिशा इंटरनॅशनल आय बँकेला संपर्क करावा.


नेत्रदानासाठी संपर्क: 9899898667 | 7378656145

Comments


bottom of page