Every Eye Matters: Deesha’s Mobile Eye Care Unit Reaches Pimpalkhuta
पिंपळखुटा येथे दिशा ग्रुपच्या फिरते नेत्र चिकित्सालयामार्फत नेत्र तपासणी शिबिर; ३३८ जणांना लाभ

ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना नेत्र तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दिशा ग्रुपच्या
फिरते नेत्र चिकित्सालया च्या माध्यमातून श्री. संत शंकर महाराज आश्रम ट्रस्ट, पिंपळखुटा येथे ९ व १० ऑक्टोबर रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या दोन दिवसीय शिबिरात एकूण ३३८ विद्यार्थी व नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली.
शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या दृष्टीची तपासणी करण्यात आली. डोळ्यांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे, दृष्टीसंबंधित समस्या वेळीच ओळखणे आणि नियमित नेत्र तपासणीचे महत्त्व पटवून देणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता. यावेळी उपस्थितांना डोळ्यांची योग्य काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. पुढील तपासणीची आवश्यकता असलेल्या व्यक्तींना त्यानुसार सल्ला देण्यात आला.
दृष्टीदोषांचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर, वाचनावर तसेच दैनंदिन कामकाजावर होऊ शकतो. त्याचप्रमाणे, नागरिकांमध्येही डोळ्यांच्या आरोग्याबाबत जागरूकता असणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या शिबिरामुळे विद्यार्थी व नागरिकांना त्यांच्या दृष्टीची तपासणी करून घेण्याची संधी मिळाली.
या शिबिराच्या आयोजनासाठी डॉ. शशांक सुभेदार, श्री श्रीकांत गोयल, श्री. अनिल देशमुख, श्री अश्विन इंगळे. तसेच आश्रमातील सर्व पदाधिकारी व कर्मचारीवृंद यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या सहकार्यामुळे शिबिराचे आयोजन सुलभतेने पार पडण्यास मदत झाली.
दिशा ग्रुपचे संस्थापक श्री. स्वप्नील अरुण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली दिशा ग्रुप नेत्र आरोग्य जनजागृती आणि ग्रामीण व दुर्गम भागांतील नागरिकांपर्यंत नेत्रसेवा पोहोचविण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे. या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी फिरते नेत्र चिकित्सालया च्या संपूर्ण टिमने महत्त्वपूर्ण योगदान दिले.
During Eye Screening Deesha team at Pimpalkhuta Eye Screening Eye Screening
दिशा ग्रुपच्या माध्यमातून राबविण्यात येणारे असे उपक्रम समाजातील विविध घटकांपर्यंत नेत्रसेवा पोहोचविण्यासोबतच नियमित नेत्र तपासणीबाबत जागरूकता निर्माण करण्यास मदत करतात. सर्वांसाठी सुलभ आणि परवडणारी नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने दिशा ग्रुपचे कार्य सातत्याने सुरू आहे.
Deesha's Mobile Eye Care Unit.




Comments