top of page

Healthy Eyes, Healthy Workplace: Deesha’s Mobile eye care Unit at Digras Tahasil Office

  • Writer: Pranali Chambhare
    Pranali Chambhare
  • Aug 8
  • 1 min read

दिशा ग्रुपच्या फिरते नेत्र चिकित्सालयाद्वारे दिग्रस तहसील कार्यालयात मोफत नेत्र तपासणी शिबिर; १०५ अधिकारी, कर्मचारी व नागरिकांची नेत्र तपासणी.


दिग्रस | ४ ऑगस्ट २०२६


दिशा ग्रुपच्या फिरते नेत्र चिकित्सालय यांच्या वतीने दिग्रस येथील तहसील कार्यालयात मोफत नेत्र तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिरात १०५ अधिकारी, कर्मचारी व नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली.

Deesha's Mobile Eye Care Unit at Digras Tahasil
Deesha's Mobile Eye Care Unit at Digras Tahasil

शिबिराचे उद्घाटन मा. तहसीलदार श्री. मयूर राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी नियमित नेत्र तपासणीचे महत्त्व अधोरेखित करत प्रत्येकाने वेळोवेळी डोळ्यांची तपासणी करून डोळ्यांची काळजी घ्यावी, असे आवाहन केले.


शिबिरामध्ये सहभागी लाभार्थ्यांची दृष्टी तपासणी, चष्म्याचा नंबर तपासणी तसेच आवश्यकतेनुसार पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले.


यावेळी दिशा इंटरनॅशनल आय बँक यांच्या वतीने नेत्रदान जनजागृती करण्यात आली. नेत्रदानाचे महत्त्व, मृत्यूनंतर नेत्रदानाची प्रक्रिया, तसेच एका नेत्रदात्यामुळे दोन कॉर्निया अंध व्यक्तींना दृष्टीदान मिळू शकते, याविषयी उपस्थितांना सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच इच्छुकांना नेत्रदानाची प्रतिज्ञा करण्याचे आवाहन करण्यात आले.

  • Tahasil Office Employee Screening
  • Deesha's Mobile Eye Care Unit
  • During Eye Screening

या शिबिराचे समन्वयक सौ. भाग्यश्री थेर यांनी नियोजन व समन्वयाची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली.


दिशा ग्रुपचे संस्थापक श्री. स्वप्नील अरुण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरात नेत्रतज्ज्ञ प्रणाली चांभरे, नेत्रपेढी तंत्रज्ञ श्री. हिमांशू बंड व श्री. अनिल देशमुख सर्व कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिले.


दर्जेदार, परवडणाऱ्या आणि सर्वांसाठी सुलभ नेत्रसेवा ग्रामीण व दुर्गम भागापर्यंत पोहोचविण्याबरोबरच नेत्रदानाबाबत समाजात जनजागृती निर्माण करण्याचे कार्य दिशा ग्रुप सातत्याने करत असून, अशा उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये डोळ्यांच्या आरोग्याविषयी जागरूकता वाढण्यास मोठी मदत होत आहे.


  • During Eye Checkup
  • Deesha Group at Tahasil office, Digras
  • During Eye Screening

नेत्रदानासाठी व नेत्र तपासणी शिबीर आयोजनासाठी संपर्क 9899898667 | 7378656145

Comments


bottom of page