Vision on Wheels: Delivering Eye Care to Kuralpurna by Deesha Mobile Eye Care Unit
दिशा ग्रुपच्या फिरते नेत्र चिकिसालय द्वारा कुरळ पुर्णा मध्ये ९५ नागरिकांची नेत्र तपासणी
दिशा एज्युकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँक यांच्या वतीने अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागात वसलेल्या कुरळ पूर्णा या गावातील भगवानदास महाराज मंदिर येथे दिनांक १३ एप्रिल २०२६ रोजी नेत्र तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

संस्थेच्या सुसज्ज फिरत्या नेत्र चिकित्सालयामध्ये एकूण ९५ जेष्ठ नागरिक व मुलांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान बहुतांश जेष्ठ नागरिकांमध्ये मोतियाबिंदू व टेरेजियम हे आजार आढळून आले.
या सर्व रुग्णांना पुढील उपचार व तपासणीसाठी विविध धर्मदाय नेत्र रुग्णालयांकडे पाठविण्यात येणार आहे.
या नेत्र तपासणी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. विनायक देशमुख, श्री. गजानन मोहोड, श्री. निशांत मोहोड, श्री. आदित्य मोहोड व श्री. सोहम मोहोड तसेच दिशा ग्रुपचे श्री. स्वप्नील अरुण गावंडे, नेत्र चिकित्सक कु. प्रणाली चांभारे व श्री. अनिल सदाशिवराव देशमुख आदी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
नियमित नेत्र तपासणीमुळे डोळ्यांशी संबंधित अनेक आजारांचे योग्य वेळी निदान होऊ शकते. त्यामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांनाही दर्जेदार नेत्रसेवा मिळावी या उद्देशाने दिशा एज्युकेशन फाऊंडेशनचे फिरते नेत्र चिकित्सालय सातत्याने कार्यरत आहे.
आपणही आपल्या गावात अशा नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यासाठी दिशा ग्रुपशी ८२७५५३९७५४ या क्रमांकावर संपर्क साधू शकता.




Comments