top of page

Kore Family donated the eyes of Late Akash Ambadas Kore (age 44) in Deesha International Eye Bank, Amravati

anildeshmukh
2 days ago
1 min read

“४४ व्या वर्षी जगाचा निरोप; लहान भावाने आपल्या मोठ्या भावाचे

मरणोत्तर नेत्रदान करून दिला मानवतेचा संदेश”


मु.डोमक, ता. मोर्शी, जिल्हा अमरावती येशील रहिवासी स्व. श्री. आकाश उर्फ बंडू अंबादास कोरे (वय ४४) यांचे दुःखद निधन झाले. कोरे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळले, परंतु अशाही परिस्थितीत श्री. सिद्धार्थ कोरे यांनी आपले मोठे भाऊ स्व. श्री. आकाश उर्फ बंडू अंबादास कोरे (वय ४४) यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. दिशा ग्रुप व दिशा एज्युकेशन फाऊंडेशन द्वारा संचालित दिशा इंटरनॅशनल आय बँक या धर्मदाय नेत्रपेढीने मरणोत्तर नेत्रकमळ दान करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली.


Kore Family donated the eyes of Late Akash Ambadas Kore in Deesha International Eye Bank, Amravati
Kore Family donated the eyes of Late Akash Ambadas Kore in Deesha International Eye Bank, Amravati

नेत्रदानाचे पवित्र कार्य केल्याबद्दल दिशा एज्युकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या संचालक मंडळाद्वारे कोरे कुटुंबियांचे आभार व्यक्त करण्यात आले. कोरे परीवाराला नेत्रदान केल्याबद्दल मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा अंतर्गत नेत्रदानाचे प्रमाणपत्र देण्यात आले. या सेवाभावी कार्यात कोरे परिवारातील वडील अंबादास कोरे, आई सौ. प्रेमीला कोरे, काका श्री. राजकुमार कोरे, जावई श्री. मनोज गवई तसेच कोरे परिवारातील इतर सदस्यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. दिशा ग्रुप व दिशा इंटरनॅशनल आय बँकेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी स्व. श्री. आकाश उर्फ बंडू अंबादास कोरे यांना श्रद्धांजली अर्पण केली


    Late Akash Kore
Late Akash Kore

भारतामध्ये कॉर्नियल अंधत्व ही गंभीर समस्या बनत चालली आहे. एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन अंध व्यक्तींना दृष्टी मिळू शकते. विशेष म्हणजे उच्च रक्तदाब, मधुमेह, दमा, चष्मा असणे किंवा मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेले असले तरीही नेत्रदान करता येते. मृत्यूनंतर सहा ते आठ तासांच्या आत नेत्रदान केले जाऊ शकते.


मृत्यूनंतर तात्काळ डोळे बंद करून त्यावर ओले कापसाचे बोळे ठेवावेत, डोक्याखाली दोन उशा ठेवाव्यात आणि पंखा बंद ठेवावा. ए.सी. सुरू ठेवला तरी चालतो. त्यामुळे मृत्युनंतर ताबडतोब दिशा इंटरनॅशनल आय बँकेला संपर्क करावा.


नेत्रदानासाठी संपर्क: 9899898667 | 7378656145

Comments


bottom of page