Deesha Group's Mobile Eye Care Unit conducted an Eye Checkup in Karanja Lad
- anildeshmukh
- Aug 27, 2024
- 1 min read
दिशा एज्युकेशन फाउंडेशन अमरावती, स्व. अरुणाबाई भोरे स्मृतीप्रित्यर्थ व कंकुबाई श्राविकाश्रम कारंजा लाड द्वारा कारंजा (लाड) येथे ७९ नागरिकांची नेत्र तपासणी.
दिशा एज्युकेशन फाउंडेशन अमरावती आयोजित फिरते नेत्र चिकित्सालय दि. २५ ऑगस्ट २०२४ रोजी कंकुबाई श्राविकाश्रम, कारंजा लाड येथे स्व. अरुणाबाई भोरे स्मृतीप्रित्यर्थ विद्यार्थ्यांचे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कंकुबाई श्राविकाश्रम मधील विद्यार्थिनींचे नेत्र तपासणी करण्यात आली.

या नेत्र तपासणी शिबिरामध्ये एकूण ७९ नागरिकांची तपासणी करण्यात आली. या नेत्रतपासणी मध्ये चष्म्याचे योग्य नंबर काढून देण्यात आले. आपण आपल्या डोळ्याची कश्या प्रकारे काळजी घेऊ शकतो या साठी मार्गदर्शन करण्यात आले. बहुतांश जेष्ठ नागरिकांच्या नेत्र तपासणी मध्ये मोतियाबिंदू आजार आढळून आले. जेष्ठाना असलेल्या मोतियाबिंदू च्या ऑपरेशन संबधी समुपदेशन करण्यात आले. यातील काही रुग्णांना पुढील तपासणीसाठी स्थानिक धर्मदाय नेत्र रुग्णालय मध्ये पाठवण्यात येणार आहे. दिशा ग्रुपच्या युवा कार्यकर्त्यांनी नागरिकांना नेत्रदानाची माहिती देऊन त्याबद्दलचे गैर समज दूर केले.
आयोजित सभेच्या अध्यक्षस्थानी मा. भरतभाऊ भोरे, डॉ. शार्दुल डोणगावकर व कंकुबाई संस्थेचे सचिव मा. संजीव रूईवाले, श्री. प्रज्वल गुलालकारी उपस्थित होते. तसेच दिशा ग्रुपचे श्री. स्वप्नील अरुण गावंडे, श्री. हिमांशू बंड, श्री. अनिल देशमुख, श्रीमती भारती तसरे, मोहम्मद नावेद आदी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.
Comentários