top of page

Deesha International Eye Bank, Amravati Celebrates World Eye Donation Day by Honoring 36 Donor Families

  • anildeshmukh
  • Jun 22, 2025
  • 2 min read

दिशा इंटरनॅशनल आय बँक व प्रयास अमरावती तर्फे नेत्रदान दिवस साजरा

श्रीमती कमलताई गवई आदी मान्यवरांनी केला नेत्रदाता परिवारांचा सन्मान

 

नेत्रदान चळवळ घरो घरी पोहचावी, दिशा ग्रुपच्या युवा टीमने सुरु केलेल्या अमरावती मधील एकमेव दिशा इंटरनॅशनल आय बँकेची सेवा संपूर्ण देशाला मिळावी व नागरिकांनी या उपक्रमा मध्ये सहभागी व्हावे असे आव्हान श्रीमती कमलताई गवई यांनी जागतीक नेत्रदान दिवसानिमित्त्य २२ जून २०२५ रोजीच्या कार्यक्रमात केले. या कार्यक्रमासाठी मेडिकल डिरेक्टर डॉ. मनिष तोटे, डेप्युटी मेडिकल डिरेक्टर डॉ. अंकित हरवाणी, अस्मिता शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा डॉ. मीनल भोंडे, प्रयास सेवांकुरचे संचालक डॉ. अविनाश सावजी, दिशा ग्रुपचे संस्थापक विश्वस्थ श्री. अरुण गावंडे आदी मान्यवर उपतिथीत होते.

World Eye Donation Day
Chief Guest Smt Kamaltai Gavai (Mother of Chief Justice of India Shri Bhushan Gavai), Dr Manish Totey, Dr Ankit Harwani, Dr Avinash Saoji and others

 या कार्यक्रमध्ये ३९ नेत्रदाता परिवारांचा सन्मान करण्यात आला. सोबत अंधत्व निवारणसाठी दिवसरात्र झटणाऱ्या १२ कार्यकर्त्यांना देखील सन्मान करण्यात आला. कार्यक्रमा दरम्यान श्रीमती कमलताई गवई पुढे म्हणाल्या कि युवकांनी सुरु केलेल्या या दिशा इंटरनॅशनल आय बँकेला इतर सर्व संस्थांनी व नागरिकांनी मदत करायला पाहिजे. लोक निधीतून सुरु झालेली दिशा इंटरनॅशनल आय बँके गेल्या अनेक वर्ष पासून संपूर्ण अमरावती मध्ये नेत्रदानाची सोय देत आहे व यवतमाळ, बुलढाणा इत्यादी ठिकाणी देखील त्यांनी शाखा सुरु केल्या आहेत.

 

त्यानंतर डॉ. मनीष तोटे व डॉ. अंकित हरवाणी यांनी नेत्रदानाचे महत्व व त्यानुसार दिशा ग्रुपचे काम सर्वांनसमोर मांडले व नेत्रदान करणाऱ्या परिवारांचे कौतुक केले. पुढे प्रयास संस्थेचे संचालक डॉ. अविनाश सावजी यांनी दिशा ग्रुपचे संस्थापक सचिव श्री. स्वप्निल अरुण गावंडे यांचा प्रेरणादायी जिवनप्रवास सर्वांसमोर मांडला व दिशा ग्रुप बद्दल माहिती देऊन सर्वांना आपल्या ध्येयाचा पाठलाग करणाच्या आवाहन केले. 

Felicitation of Jalit Family, Dr Kamaltai Jalit (Bonde), Dr Meenal Bhonde and others
Felicitation of Jalit Family, Dr Kamaltai Jalit (Bonde), Dr Meenal Bhonde and others

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. निशांत देशमुख व श्री. स्वप्नील गावंडे यांनी केले. कार्यक्रमासाठी डॉ. श्रद्धा ढाकुलकर, कु. प्रणाली चांभारे, श्री. हिमांशू बंड, श्री. अनिल देशमुख यांनी परिश्रम घेतले.

 

भारतासमोर अंधत्व हि फार मोठी समस्या उभी आहे. एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन कॉर्नियल अंधांना दृष्टी प्राप्त होऊ शकते. उच्च रक्तदाब, मधुमेह, अस्थमा असे आजार असलेल्या व्यक्तीचे देखील नेत्रदान केले जाऊ शकते तसेच चष्मा असलेले व मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेल्या व्यक्तीचे सुध्दा नेत्रदान केले जाऊ शकते. मृत्यूनंतर सहा ते आठ तासापर्यंत नेत्रदान केले जाऊ शकते. त्यामुळे मृत्युनंतर ताबडतोब दिशा इंटरनॅशनल आय बँकेला संपर्क करावा. मृत व्यक्तीचे डोळे उघडे असल्यास ते बंद करावे व त्यावर ओले कापसाचे बोळे ठेवावे. मृत व्यक्तीच्या डोक्याखाली २ उशा ठेवाव्या आणि पंखा बंद ठेवावा तसेच ए.सी. असेल तर सुरु ठेऊ शकता. नेत्रदानासाठी संपर्क: ७३७८६५६१४५, ७३७८६५६१४४, ९८९९८९८६६७



 
 
 
bottom of page