top of page

Even after death, the doctor gave sight to two people

स्व. डॉ. अरुण ठाकुरदास हरवानी यांचे दिशा इंटरनॅशनल आय बँक मध्ये नेत्रदान

अमरावती मधील सुप्रसिद्ध डॉक्टर स्व. डॉ. अरुण ठाकुरदास हरवानी यांचे दि. ०९/०३/२०२४ रोजी दुखत निधन झाले, मृत्युप्रांत डॉ. अंकित हरवानी यांनी हरवानी परिवाराला नेत्रदानाबद्द्ल माहिती देऊन नेत्रदान करण्यास प्रेरित केले. कुटूंबातील व्यक्तीच्या निधनामुळे कुटूंबियांना दुःख होणे स्वाभाविक असते. हरवानी परिवारावर सुद्धा दुःखाचा डोगर कोसळले परंतु अशाही परिस्तितीत गरजूंना या जगातील रंग पाहता येतील या उद्दात भावनेने हरवानी परिवाराच्या सदस्यांनी स्व. डॉ. अरुण ठाकुरदास हरवानी यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यानी अमरावती मधील दिशा ग्रुप व दिशा एज्युकेशन फाऊंडेशन द्वारा संचालित दिशा इंटरनॅशनल आय बँक या धर्मदाय नेत्रपेढीला संपर्क केला. दिशा ग्रुपचे सचिव श्री स्वप्निल अरुण गावंडे, दिशा आय बँकेचे मेडिकल डिरेक्त्तर डॉ मनिष बबन तोटे, श्री हिमांशू प्रमोद बंड, श्री अनिल सदाशिवराव देशमुख यांनी मरनोतर नेत्रकमळ दान करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली.


स्व. डॉ. अरुण ठाकुरदास हरवानी
स्व. डॉ. अरुण ठाकुरदास हरवानी

नेत्रदानाचे पवित्र कार्य केलाबद्दल दिशा एजुकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या अध्यक्षा सौ. कुंदा अरुण गावंडे व सचिव स्वप्निल अरुण गावंडे द्वारे हरवानी कुटुंबियांचे आभार व्यक्त करणात आले. या सेवाभावी कार्यात हरवानी परिवारातिल श्री ठाकुरदास हरवानी, श्रीमती सुशीला हरवानी, डॉ. शालिनी हरवानी, श्री महेश हरवानी, श्री अनुप हरवानी, श्री सागर महेश हरवानी, श्री हितेश हरवानी, श्री राजेश हरवानी, श्री संकल्प हरवानी व हरवानी परिवारातील इतर सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. दिशा ग्रुप व दिशा इंटरनॅशनल आय  बँकच्या सर्व संचालक मंडलाने व कार्यकर्त्यांतर्फे स्व. डॉ. अरुण ठाकुरदास हरवानी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करणात आली.


भारतासमोर अंधत्व हि फार मोठी समस्या उभी आहे. एक व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन कॉर्नियल अंधांना दृष्टी प्राप्त होऊ शकते. उच्च रक्तदाब, मधुमेह, अस्थमा इत्यादी आजार असलेले व्यक्तीचे  देखील नेत्रदान केले जाऊ शकते. चष्मा असलेले व मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेल्या व्यक्तीचे सुध्दा नेत्रदान केले जाऊ शकते. मृत्यू नंतर नेत्रदानासाठी काही काळजी घेणे गरजेचे आहे जसे मृत्यू नंतर सहा ते आठ तसा पर्येंत नेत्रदान केला जाऊ शकते. त्यामुळे मृत्युपच्यात ताबडतोप दिशा इंटरनॅशनल आय बँकेला संपर्क करावा. मृत व्यक्तीचे डोळे उघडे असल्यास ते बंद करावे व त्यावर ओले कापसाचे बोळे ठेवावे. मृत व्यक्तीच्या डोक्या खाली २ उश्या ठेवावा. पंखा बंद ठेवावा. ए.सी असेल तर सुरु ठेऊ शकता. व मृत्यूच्या करणाचे वैद्यकीय प्रमाणपत्रडॉक्टरान कडून घेऊन घ्यावे.मरनोतर नेत्रदानासाठी संपर्क करा दिशा इंटरनॅशनल आय बँक,यशोदा नगर अमरावती. मो. 9899898667, 8275539754, 7378656145 किवा स्वप्नील अरुण गावंडे - 9423424450. ऑनलाईन नेत्रदानाचा संकल्प करण्यासाठी भेट द्या www.deeshagroup.org.

176 views0 comments
bottom of page