A Legacy of Compassion: Eye Donation of Late Smt. Pratibhatai Panjabrao Deshmukh
- anildeshmukh
- 6 days ago
- 2 min read
स्व. श्रीमती प्रतिभाताई पंजाबराव देशमुख यांचे दिशा इंटरनॅशनल आय बँक मध्ये नेत्रदान
माजी पालकमंत्री व आमदार डॉ. सुनिल देशमुख, श्री प्रतापराव देशमुख व श्री अनिल देशमुख यांच्या मातोश्री स्व. श्रीमती प्रतिभाताई पंजाबराव देशमुख यांचे दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी दुःखद निधन झाले. देशमुख परिवाराने या दुःखद प्रसंगात देखील सामाजिक जाणीव लक्षात घेऊन गरजूंना या जगातील रंग पाहता येतील या उद्दात भावनेने त्यांच्या मातोश्री स्व. श्रीमती प्रतिभाताई पंजाबराव देशमुख यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. अमरावती मधील दिशा ग्रुप व दिशा एज्युकेशन फाऊंडेशन द्वारा संचालित दिशा इंटरनॅशनल आय बँक या धर्मदाय नेत्रपेढीला नेत्रदान करण्यात आले. दिशा ग्रुपचे संस्थापक सचिव श्री स्वप्निल अरुण गावंडे, दिशा इंटरनॅशनल आय बँकेचे श्री हिमांशू प्रमोद बंड, श्री अनिल सदाशिवराव देशमुख यांनी मरनोतर नेत्रकमळ दान करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली.

नेत्रदानाचे पवित्र कार्य केलाबद्दल दिशा एजुकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या अध्यक्षा सौ. कुंदा अरुण गावंडे, सचिव स्वप्निल अरुण गावंडे, मेडिकल डिरेक्टर डॉ मनिष तोटे, डॉ अंकित हरवानी द्वारे देशमुख कुटुंबियांचे आभार व्यक्त करणात आले. या सेवाभावी कार्यात देशमुख परिवारातिल श्री. प्रतापराव देशमुख, डॉ. सुनिल देशमुख, श्री. अनिल देशमुख, डॉ. सोनाली देशमुख, श्री अंगद देशमुख, सौ गौरी देशमुख व देशमुख परिवारातील इतर सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. दिशा ग्रुप व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या सर्व संचालक मंडळ व कार्यकर्त्यांतर्फे स्व. श्रीमती प्रतिभा पंजाबराव देशमुख यांना श्रद्धांजली अर्पित करणात आली.

भारतासमोर बुबुळा मुळे अंधत्व हि फार मोठी समस्या उभी आहे. एक व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन कॉर्नियल अंधांना दृष्टी प्राप्त होऊ शकते. उच्च रक्तदाब, मधुमेह, अस्थमा इत्यादी आजार असलेले व्यक्तीचे देखील नेत्रदान केले जाऊ शकते. चष्मा असलेले व मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेल्या व्यक्तीचे सुध्दा नेत्रदान केले जाऊ शकते. मृत्यू नंतर नेत्रदानासाठी काही काळजी घेणे गरजेचे आहे जसे मृत्यू नंतर सहा ते आठ तसा पर्येंत नेत्रदान केला जाऊ शकते. त्यामुळे मृत्युपच्यात ताबडतोप दिशा इंटरनॅशनल आय बँकेला संपर्क करावा. मृत व्यक्तीचे डोळे उघडे असल्यास ते बंद करावे व त्यावर ओले कापसाचे बोळे ठेवावे. मृत व्यक्तीच्या डोक्या खाली २ उश्या ठेवावा. पंखा बंद ठेवावा. ए.सी असेल तर सुरु ठेऊ शकता. व मृत्यूच्या करणाचे वैद्यकीय प्रमाणपत्र डॉक्टरान कडून घेऊन घ्यावे.
मरणोत्तर नेत्रदानासाठी संपर्क करा मो. 7378656145, 7378656144, 9899898667




Comments