दिशा ग्रुपची नेत्रसेवा: अमरावती महानगरपालिकेत ११२ कर्मचाऱ्यांची नेत्र तपासणी.
- Pranali Chambhare
- 10 minutes ago
- 1 min read

दिशा एज्युकेशन फाउंडेशन, अमरावती यांच्या वतीने संचालित फिरते नेत्र चिकित्सालय यांच्या माध्यमातून दि. २८ नोव्हेंबर २०२५ (शुक्रवार) रोजी अमरावती महानगरपालिका मुख्यालय,अंबापेठ येथे आयोजित नेत्र
तपासणी शिबिरात एकूण ११२ महानगरपालिका कर्मचार्यांची नेत्र तपासणी करण्यात आली.
या नेत्र तपासणीमध्ये कर्मचार्यांचे चष्म्याचे योग्य नंबर तपासून देण्यात आले तसेच डोळ्यांची काळजी कशी घ्याव याबाबत आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. काही कर्मचार्यांना पुढील तपासणीसाठी रुग्णालयात जाण्यास
मार्गदर्शन करण्यात आले. दिशा ग्रुपच्या युवा कार्यकर्त्यांनी नेत्रदानाविषयी जनजागृती करून नागरिकांमधील
गैरसमज दूर केले.
सभेच्या अध्यक्षस्थानी अमरावती महानगरपालिका अधिकारी —
आयुक्त सौ. सोम्या शर्मा चांडक, उपआयुक्त श्री. पिठे, वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप काळे व
डॉ. संदीप पाटबगे उपस्थित होते. तसेच दिशा ग्रुपचे संस्थापकिय सचिव श्री. स्वप्नील अरुण गावंडे, नेत्रचिकित्सक कु. प्रणाली चांभारे,नेत्रपेढी तंत्रज्ञ श्री.हिमांशू बंड,श्री.अनिल देशमुख व इतर कार्यकर्त्यांनी
शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

भारतासमोर अंधत्व ही एक गंभीर समस्या उभी आहे. एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन कॉर्नियल अंधांना दृष्टी मिळू शकते. उच्च रक्तदाब, मधुमेह, दमा इत्यादी आजार असलेले तसेच चष्मा वापरणारे किंवा मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्ती देखील
नेत्रदान करू शकतात.




Comments