Eye Donation at Deesha International Eye Bank of Late Madhukar Joharapurkar
- anildeshmukh
- Jul 2
- 2 min read
दिशा इंटरनॅशनल आय बँक अमरावती मध्ये
स्व. श्री. मधुकर अगरचंद जोहरापुरकर यांचे नेत्रदान
जोहरापूरकर सदन, चवरे लाईन, कारंजा (लाड) येथील रहिवासी स्व. श्री. मधुकर अगरचंद जोहरापुरकर यांचे दुःखत निधन झाले. कुटूंबातील व्यक्तीच्या निधनामुळे कुटूंबियांना दुःख होणे स्वाभाविक असते. जोहरापुरकर परिवारावर सुद्धा दुःखाचा डोंगर कोसळले परंतु अशाही परिस्तितीत गरजूंना या जगातील रंग पाहता येतील या उद्दात भावनेने जोहरापुरकर परिवाराच्या सदस्यांनी स्व. श्री. मधुकर अगरचंद जोहरापुरकर यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी अमरावती मधील दिशा ग्रुप व दिशा एज्युकेशन फाऊंडेशन द्वारा संचालित दिशा इंटरनॅशनल आय बँक या धर्मदाय नेत्रपेढीला संपर्क केला. दिशा ग्रुपचे सचिव श्री. स्वप्निल अरुण गावंडे, दिशा आय बँकेचे मेडिकल डिरेक्त्तर डॉ मनिष बबन तोटे, श्री. हिमांशू प्रमोद बंड, श्री. अनिल सदाशिवराव देशमुख यांनी मारनोतर नेत्रकमळ दान करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली.

नेत्रदानाचे पवित्र कार्य केलाबद्दल दिशा एज्युकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या अध्यक्षा सौ. कुंदा अरुण गावंडे व सचिव स्वप्निल अरुण गावंडे द्वारे जोहरापुरकर कुटुंबियांचे आभार व्यक्त करणात आले. जोहरापुरकर परीवाराला नेत्रदान केल्या बद्दल मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा अंतर्गत नेत्रदानाचे प्रमाणपत्र देण्यात आले. या सेवाभावी कार्यात जोहरापुरकर परिवारातील श्री. प्रसन्न जोहरापुरकर, श्री. मोहित जोहरापुरकर, श्री. संमती भोरे व इतर सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी दिशा ग्रुप कारंजाचे मार्गदर्शक डॉ. शार्दूल डोंणगावकर, डॉ. सुशील देशपांडें, डॉ. विजय जवाहरमलाणी, श्री. परमेश्वर व्यवहारे, श्री. श्रीनिवास जोशीं, श्री. आशुतोष जोहरापुरकर, श्री. विनम्र चवरे, श्रीमती प्राजक्ता माहितकर, श्री. श्रीनिवास जोशी, श्री. संजीव रुईवाले, श्री. विवेक गहाणकरी, श्री. प्रज्वल गुलालकरी उपस्थित होते. दिशा ग्रुप व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या सर्व संचालक मंडलाने व कार्यकर्त्यांतर्फे स्व. श्री. मधुकर अगरचंद जोहरापुरकर यांना श्रद्धांजली अर्पित करणात आली.

भारतासमोर अंधत्व हि फार मोठी समस्या उभी आहे. एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन कॉर्नियल अंधांना दृष्टी प्राप्त होऊ शकते. उच्च रक्तदाब, मधुमेह, अस्थमा असे आजार असलेल्या व्यक्तीचे देखील नेत्रदान केले जाऊ शकते तसेच चष्मा असलेले व मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेल्या व्यक्तीचे सुध्दा नेत्रदान केले जाऊ शकते. मृत्यूनंतर सहा ते आठ तासापर्यंत नेत्रदान केले जाऊ शकते. त्यामुळे मृत्युनंतर ताबडतोब दिशा इंटरनॅशनल आय बँकेला संपर्क करावा. मृत व्यक्तीचे डोळे उघडे असल्यास ते बंद करावे व त्यावर ओले कापसाचे बोळे ठेवावे. मृत व्यक्तीच्या डोक्याखाली २ उशा ठेवाव्या आणि पंखा बंद ठेवावा तसेच ए.सी. असेल तर सुरु ठेऊ शकता.
नेत्रदानासाठी संपर्क : ७३७८६५६१४५ । ७३७८६५६१४४ | ९८९९८९८६६७
Comments