top of page

Let's Make Mangrulpir See Better- Eye Checkup Camp Conducted by Deesha Group

Writer: Pranali Chambhare
Pranali Chambhare
Feb 10
1 min read

दिशा एज्युकेशन फाउंडेशन, अमरावती यांच्या वतीने संचालित फिरते नेत्र चिकित्सालय यांच्या माध्यमातून 

दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी श्री संत बिरबलनाथ महाराज यात्रा व श्री संत गजानन महाराज प्रकट दिना निम्मित मा. आमदार श्यामभाऊ खोडे यांच्या संकल्पनेने मंगरुळपीर, वाशीम येथे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले.


 


या नेत्र तपासणी शिबिरा मध्ये गरजू व्यक्तींच्या चष्म्याचे योग्य नंबर तपासून देण्यात आले तसेच डोळ्यांची काळजी कशी घ्यावी याबाबत आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. काही रुग्णांना पुढील तपासणी व उपचारासाठी रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. यावेळी नेत्रदान करणाऱ्या दात्यांचा कुटुंबीयांचा सन्मान करण्यात आला व त्यांच्या या महान योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली दिशा ग्रुपच्या युवा कार्यकर्त्यांनी नेत्रदानाविषयी जनजागृती करून नागरिकांमधील गैरसमज दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.


 

या नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन श्री मा. आमदार श्यामभाऊ खोडे यांनी केले. तसेच दिशा ग्रुपचे संस्थापकिय सचिव श्री. स्वप्नील अरुण गावंडे, नेत्रचिकित्सक कु प्रणाली चांभारे, नेत्रपेढी तंत्रज्ञ श्री. हिमांशू बंड, श्री. अनिल देशमुख व इतर कार्यकर्त्यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.



भारतासमोर अंधत्व ही एक गंभीर समस्या उभी आहे. एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन कॉर्नियल अंधांना दृष्टी मिळू शकते. उच्च रक्तदाब, मधुमेह, दमा इत्यादी आजार असलेले तसेच चष्मा वापरणारे किंवा मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्ती देखील नेत्रदान करू शकतात.

Comments


bottom of page