स्व. श्रीमती उज्वला उर्फ सुषमा सुधीरकुमारजी मिश्रीकोटकर यांचे
दिशा इंटरनॅशनल आय बँक मध्ये नेत्रदान
कारंजा (लाड) येथील रहिवासी स्व. श्रीमती सुषमा सुधीरकुमारजी मिश्रीकोटकर (वय ७०) यांचे दिनांक २ मे रोजी दुःखद निधन झाले. त्यांची कन्या सौ गुंजन संदेश जिंतूरकर यांची ईच्छा होती कि आईचे मरणोपरांत नेत्रदान व्हावे. त्यांच्या या इच्छेचा मान ठेवत मिश्रीकोटकर व जिंतूरकर परिवाराने दुःखाचा डोगर बाजूला सावरून अशाही परिस्तिथीत गरजूंना या जगातील रंग पाहता येतील या उद्दात भावनेने परिवाराच्या सदस्यांनी स्व. श्रीमती सुषमा सुधीरकुमारजी मिश्रीकोटकर यांचा नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला व अमरावती मधील दिशा ग्रुप द्वारा संचालित दिशा इंटरनॅशनल आय बँक या धर्मदाय नेत्र पेढीला संपर्क केला.
दिशा इंटेरनॅशनल आय बँकेचे मेडिकल डायरेक्टर डॉ. मनीष तोटे, श्री हिमांशू बंड, सचिव श्री स्वप्निल अरुण गावंडे, यांनी मरणोत्तर नेत्रकमळदान करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली. या वेळी दिशा ग्रुप कारंजाचे डॉ शार्दुल डोणगावकर, डॉ विजय जवाहरमलानी, डॉ सुशील देशपांडे, डॉ उल्हास काटोले, श्री आशिष बंड, श्री आमोद चवरे, श्री प्रज्वल गुलालकरी, श्री मनोज खोडके हे उपस्थित होते. नेत्रदान पूर्वीच्या कोविड चाचणी करिता कारंजा उपजिल्हा रुग्णालय टीम चे सहकार्य मिळाले.
या सेवाभावी कार्यात परिवारातील श्री संदेश जिंतूरकर, श्री विजय जिंतूरकर, श्री निनाद जिंतूरकर, श्री सुहास भोंगाडे व परिवारातील इतर सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. नेत्रदानाचे पवित्र कार्य केलाबद्दल दिशा एजुकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या सर्व संचालक मंडळाने व कार्यकर्त्यांतर्फे मिश्रीकोटकर व जिंतूरकर कुटुंबियांचे आभार व्यक्त करण्यात आले व स्व. श्रीमती सुषमा सुधीरकुमारजी मिश्रीकोटकर यांना श्रद्धांजली अर्पित करणात आली.
आपण देखील परिजनांच्या नेत्रदानासाठी पुढाकार घेऊ शकता व दोन दृष्टी बाधित व्यक्तींना दृष्टी देऊ शकता. उच्च रक्तदाब, मधुमेह, अस्तमा इत्यादी आजार असलेले व्यक्तीचे देखील नेत्रदान केले जाऊ शकते. चष्मा असलेले व मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेल्या व्यक्तीचे सुध्दा नेत्रदान केले जाऊ शकते. मृत्यू नंतर नेत्रदानासाठी काही काळजी घेणे गरजेचे आहे जसे मृत्यू नंतर सहा ते आठ तसा पर्येंत नेत्रदान केला जाऊ शकते. त्यामुळे मृत्युपच्यात ताबडतोप दिशा इंटरनॅशनल आय बँकेला 8275539754 किंवा 7378656145 वर संपर्क करावा. मृत व्यक्तीचे डोळे उघडे असल्यास ते बंद करावे व त्यावर ओले कापसाचे बोळे ठेवावे. मृत व्यक्तीच्या डोक्या खाली २ उश्या ठेवावा. पंखा बंद ठेवावा. ए.सी असेल तर सुरु ठेऊ शकता व मृत्यूच्या करणाचे वैद्यकीय प्रमाणपत्र डॉक्टरान कडून घेऊन घ्यावे.
Comments