top of page

Eye donation of Late Jinmati Manohar Chaware at Deesha International Eye Bank

Updated: Dec 2, 2023

स्व. श्रीमती जिन्मती मनोहर चवरे यांचे दिशा इंटरनॅशनल आय बँक मध्ये नेत्रदान

दोन बुबुळांमुळे दोन दृष्टी हिन वेक्तींना बघता येणार हे सुंदर जग…


चुनापुरा कारंजा लाड, वाशिम येशील रहिवासी स्व. श्रीमती जिन्मती मनोहर चवरे याचे दुःखद निधन झाले. कुटूंबातील व्यक्तीच्या निधनामुळे कुटूंबियांना दुःख होणे स्वाभाविक असते. चवरे परिवारावर सुद्धा दुःखाचा डोगर कोसळले परंतु अशाही परिस्तितीत गरजूंना या जगातील रंग पाहता येतील या उद्दात भावनेने चवरे परिवाराच्या सदस्यांनी स्व. श्रीमती जिन्मती मनोहर चवरे यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यानी अमरावती मधील दिशा ग्रुप व दिशा एज्युकेशन फाऊंडेशन द्वारा संचालित दिशा इंटरनॅशनल आय बँक या धर्मदाय नेत्रपेढीला संपर्क केला. दिशा ग्रुपचे सचिव श्री स्वप्निल अरुण गावंडे, दिशा आय बँकेचे मेडिकल डिरेक्त्तर डॉ मनिष बबन तोटे, श्री हिमांशू प्रमोद बंड, श्री अनिल सदाशिवराव देशमुख यांनी मारनोतर नेत्रकमळ दान करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली. यावेळी दिशा ग्रुप कारंजाचे डॉ राम गुंजाटे, डॉ पद्माकर मिसाळ, डॉ. विजय जवाहरमलानी, डॉ.उल्हास काटोले , डॉ अमोल उगले, डॉ रागेब अहमद खान, परमेश्वर व्यवहारे, भारत हरसुले, प्रसन्न जोहरापुरकर, आनंद चवरे, उज्वल रायबाकर, प्रज्वल गुलालकरी उपस्थित होते.

चवरे कुटुंबीयांनी स्व. जिंमती चवरे यांचे नेत्रकलम दिशा इंटरनॅशनल आय बँकेला सुपूर्त केले.
चवरे कुटुंबीयांनी स्व. जिंमती चवरे यांचे नेत्रकलम दिशा इंटरनॅशनल आय बँकेला सुपूर्त केले.
 स्व. श्रीमती जिन्मती मनोहर चवरे
स्व. श्रीमती जिन्मती मनोहर चवरे

नेत्रदानाचे पवित्र कार्य केलाबद्दल दिशा एजुकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या अध्यक्षा सौ. कुंदा अरुण गावंडे व सचिव स्वप्निल अरुण गावंडे द्वारे चवरे कुटुंबियांचे आभार व्यक्त करणात आले. चवरे परीवाला नेत्रदाना केल्या बद्दल मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा अंतर्गत नेत्रदानाचे प्रमाणपत्र देण्यात आले. या सेवाभावी कार्यात श्री दिनेश चवरे, श्री दिलीप चवरे , श्री किरण चवरे, श्री संदीप चवरे व चवरे परिवारातील इतर सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. दिशा ग्रुप व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या सर्व संचालक मंडलाने व कार्यकर्त्यांतर्फे स्व. श्रीमती जिन्मती मनोहर चवरे यांना श्रद्धांजली अर्पित करणात आली.
22 views0 comments

Comments


bottom of page