top of page
anildeshmukh

Eye donation of Late Madhukar Ratanlal Chawere at Deesha International Eye Bank

स्व. श्री मधुकर रतनलालजी चवरे यांचे दिशा इंटरनॅशनल आय बँक मध्ये नेत्रदान

 

महाविर चौक, कारंजा येथील रहिवासी स्व. श्री मधुकर रतनलालजी चवरे यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी २ एप्रिल रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. निधनानंतर चवरे कुटुंबाने आपल्यावरील दुखाचा डोंगर बाजुला सारून त्यांची मुलगी सौ राजश्री धनंजय गहाणकरी, सौ जयश्री समीर जोहरापूरकर, जगदीश चवरे यांच्या पुढाकाराने गरजूंना या जगातील रंग पाहता यावे याउदात्त भावनेने नेत्रदानाचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यानी अमरावती येथील दिशा इंटरनॅशनल आय बँक या धर्मदाय नेत्रपेढीला श्री सुधीर देशपांडे यांनी संपर्क केला. दिशा ग्रुपचे सचिव श्री स्वप्निल अरुण गावंडे, दिशा आय बँकेचे मेडिकल डिरेक्त्तर डॉ मनिष बबन तोटे, श्री हिमांशू प्रमोद बंड,श्री अनिल सदाशिवराव देशमुख यांनी मरनोतर नेत्रकमळ दान करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली.

चवरे, गहनकारी, जोहरापुरकर कुटुंबीयांनी स्व. श्री मधुकर रतनलालजी चवरे यांचे नेत्रकलम दिशा इंटरनॅशनल आय बँकेला सुपूर्त केले.
चवरे, गहनकारी, जोहरापुरकर कुटुंबीयांनी स्व. श्री मधुकर रतनलालजी चवरे यांचे नेत्रकलम दिशा इंटरनॅशनल आय बँकेला सुपूर्त केले.

यावेळी दिशा ग्रुप कारंजाचे मार्गदर्शक डॉ अजय कांत, डॉ. विजय जवाहरमलानी, डॉ सुशील देशपांडे,डॉ उल्हास काटोले, शेखर बंग, सदस्य सुदर्शन दर्यापूरकर, प्रज्वल गुलालकरी, सौ मनीषा रायबाकर, बाहूबली रायबाकर, हेमंत चवरे, किरण चवरे, प्रितम गहाणकरी, विजय जिंतूरकर, आनंद चवरे, धीरज गहाणकरी, विवेक गहाणकरी,राहुल चवरे, राजेंद्र खंडारे, सुहास भोंगाडे उपस्थित होते. नेत्रदानाच्या सेवाभावी कार्यासाठी परिवारातील इतर सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्याबद्दल दिशा एजुकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या सर्व संचालक मंडळाने व कार्यकर्त्यांनी चवरे, गहनकारी, जोहरापुरकर कुटुंबीयांचे आभार व्यक्त केले व स्व. श्री मधुकर रतनलालजी चवरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.


नेत्रदाता  स्व. श्री मधुकर रतनलालजी चवरे
नेत्रदाता स्व. श्री मधुकर रतनलालजी चवरे

भारतासमोर अंधत्व हि फार मोठी समस्या उभी आहे. एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन कॉर्नियल अंधांना दृष्टी प्राप्त होऊ शकते. उच्च रक्तदाब, मधुमेह, अस्थमा असे आजार असलेल्या व्यक्तीचे देखील नेत्रदान केले जाऊ शकते तसेच चष्मा असलेले व मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेल्या व्यक्तीचे सुध्दा नेत्रदान केले जाऊ शकते. मृत्यूनंतर सहा ते आठ तासापर्यंत नेत्रदान केले जाऊ शकते. त्यामुळे मृत्युनंतर ताबडतोब दिशा इंटरनॅशनल आय बँकेला संपर्क करावा. मृत व्यक्तीचे डोळे उघडे असल्यास ते बंद करावे व त्यावर ओले कापसाचे बोळे ठेवावे. मृत व्यक्तीच्या डोक्याखाली २ उशा ठेवाव्या आणि पंखा बंद ठेवावा तसेच ए.सी. असेल तर सुरु ठेऊ शकता.

ความคิดเห็น


bottom of page