स्व. परवीन मुस्तफा हसलानी यांचे याचे नेत्रकमळ दिशा आय बँके कडे सुपूर्त
यवतमाळ येथील रहिवासी स्व. परवीन मुस्तफा हसलानी यांचे दुःखद निधन झाले. कुटूंबातील व्यक्तीच्या निधनामुळे कुटूंबियांना दुःख होणे स्वाभाविक असते. हसलानी परिवारावर सध्या दुःखाचा डोगर कोसळले परंतु अशाही परिस्तिथीत गरजूंना या जगातील रंग पाहता येतील या उद्दात भावनेने हसलानी व सायानी परिवाराच्या सदस्यांनी स्व. परवीन मुस्तफा हसलानी यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला.
त्यांनी यवतमाळ मधील यवतमाळ मधील दिशा ग्रुप व दिशा एज्युकेशन फाऊंडेशन द्वारा संचालित दिशा आय बँक या धर्मदाय नेत्रपेढीला संपर्क केला. दिशा ग्रुपचे सचिव श्री स्वप्निल अरुण गावंडे, दिशा आय बँकेचे मेडिकल डिरेक्टर डॉ आशिष पोटफोळे, डॉ विजय कावलकर यांनी मरणोत्तर नेत्रकमळ दान करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली.
नेत्रदानाचे पवित्र कार्य केलाबद्दल दिशा एजुकेशन फाऊंडेशन व दिशा आय बँकच्या अध्यक्षा सौ. कुंदा अरुण गावंडे व सचिव स्वप्निल अरुण गावंडे द्वारे हसलानी व सायानी कुटुंबियांचे आभार व्यक्त करण्यात आले. हसलानी व सायानी परीवाला नेत्रदाना केल्या बद्दल मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा अंतर्गत नेत्रदानाचे प्रमाणपत्र देण्यात आले. या सेवाभावी कार्यात हसलानी व सायानी परिवारातिल आझाद सायानी, निलोफर सायानी व हसलानी, सायानी परिवारातील इतर सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. दिशा ग्रुप व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या सर्व संचालक मंडलाने व कार्यकर्त्यांतर्फे स्व. परवीन मुस्तफा हसलानी यांना श्रद्धांजली अर्पित करणात आली.
Comments