top of page

Eye Donation of Late Ramdas Ramteke through Deesha Eye Bank will help two corneal blinds

रामटेके परिवाराने सोपवले स्व. श्री रामदास लक्ष्मण रामटेके यांचे नेत्रकमळ

दिशा इंटरनॅशनल आय बँक या धर्मदाय नेत्रपेढीला


यशोदा नगर, अमरावती येथील रहिवासी स्व. श्री रामदास लक्ष्मण रामटेके यांचे दुःखद निधन झाले. कुटूंबातील व्यक्तीच्या निधनामुळे कुटूंबियांना दुःख होणे स्वाभाविक असते. रामटेके परिवारावर सुद्धा दुःखाचा डोगर कोसळले परंतु अशाही परिस्तिथीत गरजूंना या जगातील रंग पाहता येतील या उद्दात भावनेने रामटेके परिवाराच्या सदस्यांनी स्व. श्री रामदास लक्ष्मण रामटेके यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला व त्यांनी अमरावती मधील दिशा ग्रुप व दिशा एज्युकेशन फाऊंडेशन द्वारा संचालित दिशा इंटरनॅशनल आय बँक या धर्मदाय नेत्रपेढीला संपर्क केला. दिशा ग्रुपचे सचिव श्री स्वप्निल अरुण गावंडे, दिशा इंटरनॅशनल आय बँकेचे मेडिकल डिरेक्त्तर डॉ मनिष बबन तोटे, श्री हिमांशू प्रमोद बंड, शुभम सुनील खंडारे यांनी मरणोत्तर नेत्रकमळ दान करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली.


Swapnil Arun Gawande felicitating eye donor family
Swapnil Gawande felicitated Ramteke Family for Eye Donation

या सेवाभावी कार्यात रामटेके परिवारातिल श्री देवेंद्र रामदास रामटेके , श्री रवींद्र रामदास रामटेके व रामटेके परिवारातील इतर सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. रामटेके परीवाला नेत्रदाना केल्या बद्दल मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा अंतर्गत नेत्रदानाचे प्रमाणपत्र देण्यात आले. नेत्रदानाचे पवित्र कार्य केलाबद्दल दिशा एजुकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या अध्यक्षा सौ. कुंदा अरुण गावंडे व सचिव स्वप्निल अरुण गावंडे द्वारे रामटेके कुटुंबियांचे आभार व्यक्त करण्यात आले. दिशा ग्रुप व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या सर्व संचालक मंडलाने व कार्यकर्त्यांतर्फे स्व. श्री रामदास लक्ष्मण रामटेके यांना श्रद्धांजली अर्पित करणात आली.


उच्च रक्तदाब, मधुमेह, अस्थमा इत्यादी आजार असलेले व्यक्तीचे देखील नेत्रदान केले जाऊ शकते. चष्मा असलेले व मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेल्या व्यक्तीचे सुध्दा नेत्रदान केले जाऊ शकते. मृत्यू नंतर नेत्रदानासाठी काही काळजी घेणे गरजेचे आहे जसे मृत्यू नंतर सहा ते आठ तसा पर्येंत नेत्रदान केला जाऊ शकते. त्यामुळे मृत्युपच्यात ताबडतोप आय बँकेला संपर्क करावा. मृत व्यक्तीचे डोळे उघडे असल्यास ते बंद करावे व त्यावर ओले कापसाचे बोळे ठेवावे. मृत व्यक्तीच्या डोक्या खाली २ उश्या ठेवावा. पंखा बंद ठेवावा. ए.सी असेल तर सुरु ठेऊ शकता. व मृत्यूच्या करणाचे वैद्यकीय प्रमाणपत्र डॉक्टरान कडून घेऊन घ्यावे.6 views0 comments

Comments


bottom of page