स्व. श्री काशीराम बळीराम चौधरी यांचे दिशा इंटरनॅशनल आय बँक मध्ये नेत्रदान
चौधरी परीवाला देण्यात आले मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा अंतर्गत नेत्रदानाचे प्रमाणपत्र
अमरावती येथील रहिवासी स्व श्री. काशीराम बळीराम चौधरी यांचे दुःखद निधन झाले. चौधरी परिवारावर दुःखाचा डोगर कोसळले परंतु अशाही परिस्तिथीत गरजूंना या जगातील रंग पाहता येतील या उद्दात भावनेने चौधरी परिवाराच्या सदस्यांनी स्व. श्री काशीराम बळीराम चौधरी यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला व त्यांनी अमरावती मधील दिशा ग्रुप व दिशा एज्युकेशन फाऊंडेशन द्वारा संचालित दिशा इंटरनॅशनल आय बँक या धर्मदाय नेत्रपेढीला संपर्क केला. दिशा ग्रुपचे सचिव श्री स्वप्निल अरुण गावंडे, दिशा इंटरनॅशनल आय बँकेचे मेडिकल डिरेक्टर डॉ मनिष बबन तोटे, श्री हिमांशू प्रमोद बंड यांनी मरणोत्तर नेत्रकमळ दान करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली.
नेत्रदानाचे पवित्र कार्य केलाबद्दल दिशा एजुकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या अध्यक्षा सौ. कुंदा अरुण गावंडे व सचिव स्वप्निल अरुण गावंडे द्वारे चौधरी कुटुंबियांचे आभार व्यक्त करण्यात आले. चौधरी परीवाला नेत्रदाना केल्या बद्दल मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा अंतर्गत नेत्रदानाचे प्रमाणपत्र देण्यात आले. या सेवाभावी कार्यात चौधरी परिवारातिल श्री गजानन बळीराम चौधरी, श्री अजय वानखडे, श्री दिपक सरोदे व चौधरी परिवारातील इतर सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. दिशा ग्रुप व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या सर्व संचालक मंडलाने व कार्यकर्त्यांतर्फे स्व. श्री काशीराम बळीराम चौधरी यांना श्रद्धांजली अर्पित करणात आली.
मारनोतर नेत्रदानासाठी किंवा नेत्रदान संबंधी अधिक माहिती साठी संपर्क करा दिशा इंटरनॅशनल आय बँक,यशोदा नगर अमरावती. मो. 9899898667, 8275539754, 7378656145 किवा स्वप्नील अरुण गावंडे - 9423424450.
Comentarios