top of page

Late Shri Milind Moghe helped two corneal blinds to see this world.

स्व. श्री मिलिंद यशवंत मोघे यांचे दिशा इंटरनॅशनल आय बँक मध्ये नेत्रदान

दोन बुबुळामुळे दृष्टी बाधित व्यक्तीनं मिळणार नवीन जीवन जगण्याची दृष्टी


अमरावती येथील सराफ लेआऊट मधील रहिवासी स्व. श्री मिलिंद यशवंत मोघे यांचे दुःखद निधन झाले. मोघे परिवारावर दुःखाचा डोगर कोसळले परंतु अशाही परिस्तितीत गरजूंना या जगातील रंग पाहता येतील या उद्दात भावनेने मोघे परिवाराच्या सदस्यांनी स्व.श्री मिलिंद यशवंत मोघे यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी अमरावती मधील दिशा ग्रुप व दिशा एज्युकेशन फाऊंडेशन द्वारा संचालित दिशा इंटरनॅशनल आय बँक या धर्मदाय नेत्रपेढीला संपर्क केला. दिशा ग्रुपचे सचिव श्री स्वप्निल अरुण गावंडे, दिशा आय बँकेचे मेडिकल डिरेक्त्तर डॉ मनिष बबन तोटे, श्री हिमांशू प्रमोद बंड, कु. शिवानी कोल्हे यांनी मारनोतर नेत्रकमळ दान करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली.

Deesha International Eye Bank felicitated Moghe Family from Amravati
Deesha International Eye Bank felicitated Moghe Family from Amravati

या सेवाभावी कार्यात मोघे परिवारातिल कु. समृद्धी मोघे, श्रीमती सोनाली धामोणकर, श्रीमती जयलक्षमी टाले व मोघे परिवारातील इतर सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. नेत्रदाना साठी सर्वाना प्रोसाहित करण्या करीत कु. प्राप्ती गोटकर याची मोलाचे सहकार्य लाभले. यांनी केले नेत्रदानाचे पवित्र कार्य केलाबद्दल दिशा एजुकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या अध्यक्षा सौ. कुंदा अरुण गावंडे व सचिव स्वप्निल अरुण गावंडे द्वारे मोघे कुटुंबियांचे आभार व्यक्त करणात आले. मोघे परीवाला नेत्रदाना केल्या बद्दल मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा अंतर्गत नेत्रदानाचे प्रमाणपत्र देण्यात आले. दिशा ग्रुप व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या सर्व संचालक मंडलाने व कार्यकर्त्यांतर्फे स्व.श्री मिलिंद यशवंत मोघे यांना श्रद्धांजली अर्पित करणात आली.
Comments


bottom of page