The Inspiring Story of the Chaware: How Eye Donation Helped Others See the World
- anildeshmukh
- 19 hours ago
- 2 min read
Updated: 11 minutes ago
दिशा इंटरनॅशनल आय बँक मध्ये
स्व. श्री. देवकुमार रुखबदास चवरे यांचे नेत्रदान
चवरे लाईन, कारंजा (लाड) येथील रहिवासी, कारंजा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष स्व. श्री. देवकुमार रुखबदास चवरे (वय ९३ वर्ष) यांचे, ३ सप्टेंबर रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. २०१९ मध्ये स्व. श्री. देवकुमार रुखबदास चवरे यांनी दिशा इंटरनॅशनल आय बँक, अमरावती येथे नेत्रदानाचा संकल्प केला होता. तरी नेत्रदान संकल्पाचा माण ठेऊन चवरे कुटुंबीयांनी स्व. श्री. देवकुमार रुखबदास चवरे यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला.यासाठी त्यांनी अमरावती मधील दिशा ग्रुप व दिशा एज्युकेशन फाऊंडेशन द्वारा संचालित दिशा इंटरनॅशनल आय बँक या धर्मदाय नेत्रपेढीला संपर्क केला. दिशा ग्रुपचे सचिव श्री. स्वप्निल अरुण गावंडे, दिशा आय बँकेचे मेडिकल डिरेक्त्तर डॉ मनिष बबन तोटे, श्री. हिमांशू प्रमोद बंड, श्री. अनिल सदाशिवराव देशमुख यांनी मारनोतर नेत्रकमळ दान करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली.

नेत्रदानाचे पवित्र कार्य केलाबद्दल दिशा एज्युकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या अध्यक्षा सौ. कुंदा अरुण गावंडे व सचिव स्वप्निल अरुण गावंडे द्वारे चवरे कुटुंबियांचे आभार व्यक्त करणात आले. चवरे परीवाराला नेत्रदान केल्या बद्दल मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा अंतर्गत नेत्रदानाचे प्रमाणपत्र देण्यात आले. या सेवाभावी कार्यात चवरे परिवारातील श्री. शिरीष चवरे, श्री. आलोक चवरे, श्री. नवनीत चवरे, श्री. विवेक चवरे, श्रीमती प्रज्ञाताई डोणगावकर व इतर सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी दिशा ग्रुप कारंजाचे मार्गदर्शक डॉ. सुशील देशपांडें, डॉ. शार्दूल डोणगावकर, डॉ. विवेक गुढे, श्री. शेखर बंग, श्री. प्रज्वल गुलालकरी उपस्थित होते. दिशा ग्रुप व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या सर्व संचालक मंडलाने व कार्यकर्त्यांतर्फे स्व. श्री. देवकुमार रुखबदास चवरे यांना श्रद्धांजली अर्पित करणात आली.

भारतासमोर अंधत्व हि फार मोठी समस्या उभी आहे. एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन कॉर्नियल अंधांना दृष्टी प्राप्त होऊ शकते. उच्च रक्तदाब, मधुमेह, अस्थमा असे आजार असलेल्या व्यक्तीचे देखील नेत्रदान केले जाऊ शकते तसेच चष्मा असलेले व मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेल्या व्यक्तीचे सुध्दा नेत्रदान केले जाऊ शकते. मृत्यूनंतर सहा ते आठ तासापर्यंत नेत्रदान केले जाऊ शकते. त्यामुळे मृत्युनंतर ताबडतोब दिशा इंटरनॅशनल आय बँकेला संपर्क करावा. मृत व्यक्तीचे डोळे उघडे असल्यास ते बंद करावे व त्यावर ओले कापसाचे बोळे ठेवावे. मृत व्यक्तीच्या डोक्याखाली २ उशा ठेवाव्या आणि पंखा बंद ठेवावा तसेच ए.सी. असेल तर सुरु ठेऊ शकता.
नेत्रदानासाठी संपर्क: ७३७८६५६१४५, ७३७८६५६१४४, ९८९९८९८६६७
Comments