top of page

A Heartfelt Appreciation to the Kakani Family for Their Gift of Sight

स्व. नंदकिशोर सुंदरलाल काकाणी यांचे दिशा इंटरनॅशनल आय बँक मध्ये नेत्रदान

काकाणी परिवाराने जोपासली सामाजिक बांधिलकी


अमरावती येथील मुधोळकर पेठ मधील रहिवासी श्री नंदकिशोर सुंदरलाल काकाणी यांचे दिनांक १८ मार्च २०२३ रोजी दुःखद निधन झाले. मृतुप्रंत डॉ नीरज मुरके व श्री प्रेमकिशोर नंदकिशोर काकाणी यांनी दिशा ग्रुपचे संस्थापक सचिव श्री स्वप्निल अरुण गावंडे यांना नेत्रदान करिता फोन केला. कुटूंबातील व्यक्तीच्या निधनामुळे कुटूंबियांना दुःख होणे स्वाभाविक असते.


काकाणी परिवारावर सुद्धा दुःखाचा डोगर कोसळले परंतु अशाही परिस्तिथीत गरजूंना या जगातील रंग पाहता येतील या उद्दात भावनेने काकाणी परिवाराच्या सदस्यांनी स्व. श्री नंदकिशोर सुंदरलाल काकाणी यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला व अमरावती मधील दिशा ग्रुप व दिशा एज्युकेशन फाऊंडेशन द्वारा संचालित दिशा इंटरनॅशनल आय बँक या नेत्रपेढीला नेत्रदानाची संमती दिली. दिशा ग्रुपचे सचिव श्री स्वप्निल अरुण गावंडे, दिशा इंटरनॅशनल आय बँकेचे मेडिकल डिरेक्त्तर डॉ मनिष बबन तोटे, श्री हिमांशू प्रमोद बंड, श्री शुभम खंडारे यांनी मरणोत्तर नेत्रकमळ दान करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली.


नेत्रदानाचे पवित्र कार्य केलाबद्दल दिशा एजुकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या अध्यक्षा सौ. कुंदा अरुण गावंडे व सचिव स्वप्निल अरुण गावंडे द्वारे काकाणी कुटुंबियांचे आभार व्यक्त करण्यात आले. काकाणी परीवाला नेत्रदाना केल्या बद्दल मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा अंतर्गत नेत्रदानाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या सेवाभावी कार्यात काकाणी पररिवारातील श्री प्रेमकिशोर नंदकिशोर काकाणी, श्री दीपक मंत्री, डॉ नीरज मुरके व इतर सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. दिशा ग्रुप व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या सर्व संचालक मंडळाने व कार्यकर्त्यां तर्फे स्व. श्री नंदकिशोर सुंदरलाल काकाणी यांना श्रद्धांजली अर्पित करणात आली.


भारतासमोर अंधत्व हि फार मोठी समस्या उभी आहे. एक व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन कॉर्नियल अंधांना दृष्टी प्राप्त होऊ शकते. उच्च रक्तदाब, मधुमेह, अस्थमा इत्यादी आजार असलेले व्यक्तीचे देखील नेत्रदान केले जाऊ शकते. चष्मा असलेले व मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेल्या व्यक्तीचे सुध्दा नेत्रदान केले जाऊ शकते. मृत्यू नंतर नेत्रदानासाठी काही काळजी घेणे गरजेचे आहे जसे मृत्यू नंतर सहा ते आठ तसा पर्येंत नेत्रदान केला जाऊ शकते. त्यामुळे मृत्युपच्यात ताबडतोप दिशा इंटरनॅशनल आय बँकेला संपर्क करावा. मृत व्यक्तीचे डोळे उघडे असल्यास ते बंद करावे व त्यावर ओले कापसाचे बोळे ठेवावे. मृत व्यक्तीच्या डोक्या खाली २ उश्या ठेवावा. पंखा बंद ठेवावा. ए.सी असेल तर सुरु ठेऊ शकता. व मृत्यूच्या करणाचे वैद्यकीय प्रमाणपत्र डॉक्टरान कडून घेऊन घ्यावे.


मारनोतर नेत्रदानासाठी संपर्क करा दिशा इंटरनॅशनल आय बँक,यशोदा नगर अमरावती. मो. 9899898667, 8275539754, 7378656145 किवा स्वप्नील अरुण गावंडे - 9423424450. ऑनलाईन नेत्रदानाचा संकल्प करण्यासाठी भेट द्या www.deeshagroup.org


101 views0 comments

Comments


bottom of page