top of page

Deesha International Eye Bank: Two Eye Donations in Three Days

दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या प्रयत्नाने वाढते आहे अमरावती मध्ये नेत्रदान

तीन दिवसात अमरावती मध्ये दोन नेत्रदान.


अमरावती येथील रहिवासी स्व. श्रीमती नीला मनोहरराव गाडगे व स्व. श्री लक्ष्मण जयराम कांबळे यांचे दुःखद निधन झाले. कुटूंबातील व्यक्तीच्या निधनामुळे कुटूंबियांना दुःख होणे स्वाभाविक असते. दोन्ही परिवारावर सुद्धा दुःखाचा डोगर कोसळला परंतु अशाही परिस्तितीत गरजूंना या जगातील रंग पाहता येतील या उद्दात भावनेने गाडगे, रेले परिवार व कांबळे परिवाराच्या सदस्यांनी स्व. श्रीमती नीला मनोहरराव गाडगे व स्व. श्री लक्ष्मण जयराम कांबळे यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यानी अमरावती मधील दिशा ग्रुप द्वारा संचालित दिशा इंटरनॅशनल आय बँक या धर्मदाय नेत्रपेढीला संपर्क केला. दिशा इंटेरनॅशनल आय बँकेचे मेडिकल डायरेक्टर डॉ. मनीष तोटे, श्री हिमांशू बंड, श्री अनिल देशमुख, सचिव श्री स्वप्निल अरुण गावंडे यांनी मरणोत्तर नेत्रकमळ दान करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली.

Deesha International Eye Bank felicitated Gadge Family for Eye Donation
Deesha International Eye Bank felicitated Gadge Family for Eye Donation.

Deesha International Eye Bank felicitated Kambale Family for Eye Donation
Deesha International Eye Bank felicitated Kambale Family for Eye Donation.

या सेवाभावी कार्यात गाडगे व रेले परिवारातील श्रीमती भैरवी रेले, श्रीमती वर्षा गाडगे, कु. संस्कृती रेळे व कांबळे परिवारातील श्री सुनील कांबळे, श्री विजय कांबळे, श्री सुमित कावटे व दोन्ही परिवारातील इतर सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. गाडगे व कांबळे परीवाला नेत्रदाना केल्या बद्दल मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा अंतर्गत नेत्रदानाचे प्रमाणपत्र देण्यात आले. नेत्रदानाचे पवित्र कार्य केलाबद्दल दिशा एज्युकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या सर्व संचालक मंडळाने व कार्यकर्त्यांतर्फे गाडगे व कांबळे कुटुंबियांचे आभार व्यक्त करण्यात आले व स्व. श्रीमती नीला मनोहरराव गाडगे व श्री लक्ष्मण जयराम कांबळे यांना श्रद्धांजली अर्पित करणात आली.

Late Neela Gadge
Late Neela Gadge
Late Laxman Kambale
Late Laxman Kambale













bottom of page