म. ब्र. आश्रम जैन गुरुकुल ट्रस्ट कारंजा (लाड) मध्ये १३१ मुलाचे नेत्र तपासणी
दिशा ग्रुपच्या फिरते नेत्र चिकिसालय द्वारा करण्यात आली
दिशा एज्युकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँक द्वारा ग्रामीण व दुर्गम भागात नेत्र चिकित्सा फिरते नेत्र चिकित्सालय द्वारे उपलब्ध करून दिली आहे. या फिरत्या नेत्र चिकिसालय द्वारा वाशीम जिल्हा मधील कारंजा (लाड), म. ब्र. आश्रम जैन गुरुकुल ट्रस्ट येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये गुरुकुल मधील निवासी मुलांचे व परिसरातील नागरिकांचे मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून म.ब्र. आश्रम ट्रस्ट विश्वस्त श्री राजाभाऊ डोणगावकर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून स्टेट बँक कारंजाचे मॅनेजर श्री योगेश अवघडे हे होते, दिशा एज्युकेशन फाऊंडेशन चे सचिव श्री स्वप्निल गावंडे तसेच डॉक्टर शार्दुल डोणगावकर, श्री अभिषेक मालपाणी हे उघटनासाठी उपस्थित होते.
या नेत्र तपासणी शिबिरामध्ये एकूण १३१ निवासी मुलांची व परिसरलीत नागरिकांची मोफत नेत्रतपासणी करून देण्यात अली. या नेत्रतपासणी मध्ये ज्या मुलांना चष्म्याची गरज होती त्यांना योग्य नंबर काढून देण्यात आले. व काही मुलांना जास्त चष्मे नंबर असल्याचे आढळले. त्यांना आपण आपल्या डोळ्याची कश्या प्रकारे काळजी घेऊ शकतो या साठी जोग्या मार्ग दर्शन व डोळ्याचे व्यायाम सांगण्यात आले. तपासणी दरम्यान काही जेष्ठ नागरिकांच्या नेत्र तपासणी मध्ये मोतियाबिंदू आजार आढळून आले. जेष्ठाना असलेल्या मोतियाबिंदू च्या ऑपरेशन संबधी समुपदेशन करण्यात आले. यातील काही जेष्ठा नागरिकांना व मुलांना पुढील तपासणी साठी स्थानिक धर्मदाय नेत्र रुग्णालय मध्ये पाठवण्यात येणार आहे. दिशा ग्रुपच्या युवा कार्यकर्त्यांनी नागरिकांना नेत्रदानाची माहिती देऊन त्याबद्दलचे गैर समज दूर केले.
या नेत्र तपासणी शिबिराच्या आयोजन करिता म.ब्र. आश्रम जैन गुरूकुल ट्रस्टचे संचालक सुहास चवरे, प्रमोद चवरे, परिमल रुईवाले व पियुष डोणगावकर, म. ब्र. आश्रम हायस्कूलच्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी व संस्थेच्या इतर पदाधिकाऱ्यानी तसेच दिशा ग्रुपचे श्री स्वप्नील अरुण गावंडे, श्री हिमांशू बंड, श्रीमती भारती तसरे, श्री मोहम्मद नावेद आदी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.
Comments