top of page

Vision Beyond Sight: An Inspiring Evening with Dr. Bhavesh Bhatia

  • Writer: Pranali Chambhare
    Pranali Chambhare
  • May 15
  • 2 min read

दि. ११ मे २०२६ रोजी सांस्कृतिक भवन येथे स्वर्गीय अशोकराव गायगोले यांच्या जयंतीनिमित्त एक प्रेरणादायी सामाजिक कार्यक्रम उत्साहात पार पडला.


Dr. Bhavesh Bhatia addressing the gathering.
 Dr. Bhavesh Bhatia addressing the gathering at Sanskrutik Bhavan, Amravati

समाजात जनजागृती निर्माण करणे आणि सकारात्मक सामाजिक परिवर्तन घडवून आणणे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते प्रसिद्ध उद्योजक आणि प्रेरणादायी वक्ते डॉ. भावेश भाटिया यांची उपस्थिती. दृष्टिदोषासारख्या मोठ्या आव्हानांवर मात करत त्यांनी “Sunrise Candles” या उपक्रमाद्वारे जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर यशस्वी प्रवास उभा केला आहे.


  • Dr. Bhavesh Bhatiya with Mrs Neeta Ambani
  • Mr Swapnil Gawande with Dr. Bhavesh Bhatia, Mrs Neeta Bhatia and Mr Kunal Bhavesh Bhatia
  • Dr. Bhavesh Bhatia With Mr. Mukesh Ambani

महाबळेश्वर येथून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज देशभर प्रेरणेचा दीप बनला आहे. दृष्टी नसतानाही त्यांनी

केवळ स्वतःचे आयुष्य घडवले नाही, तर अनेक दिव्यांग व्यक्तींना रोजगार आणि आत्मनिर्भरतेची नवी दिशा दिली. त्यांच्या कार्याची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली असून, त्यांचा जीवनप्रवास संघर्षातून यशाकडे वाटचाल करणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरला आहे.


कार्यक्रमादरम्यान डॉ. भावेश भाटिया यांनी अडचणींवर मात करणे, आत्मविश्वास वाढवणे आणि मर्यादांना संधीमध्ये रूपांतरित करण्याविषयी आपले विचार मांडले. त्यांच्या अनुभवांनी आणि प्रेरणादायी शब्दांनी उपस्थितांच्या मनात नवी ऊर्जा निर्माण केली.


  • Invoking divine blessings at the beginning of the inspiring event at Amravati
  • A special group moment. with Dr. Bhavesh Bhatia, Gaigole family and Deesha family
  • Dr. Bhavesh Bhatia at Amravati event

कार्यक्रमातील सर्वात भावनिक क्षण म्हणजे स्वर्गीय अशोकराव गायगोले यांच्या कार्याचे स्मरण. कर्तृत्व, उद्योजकता प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकी यांचे ते जिवंत उदाहरण होते. अकोट तालुक्यातील कवठा गावातून अत्यंत साध्या परिस्थितीत अमरावती येथे येऊन त्यांनी स्वतःच्या मेहनतीच्या बळावर आपले स्वतंत्र विश्व निर्माण केले. वर्तमानपत्र विक्रीपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास औषध व्यवसाय, समाजकारण आणि सामाजिक कार्यापर्यंत पोहोचला. पुरोगामी विचारसरणी, स्पष्टवक्तेपणा आणि समाजासाठी काहीतरी वेगळं करण्याची त्यांची वृत्ती अनेकांसाठी प्रेरणादायी होती. त्यांनी आयुष्यभर सामाजिक कार्याला प्राधान्य दिलं आणि मृत्यूनंतरही नेत्रदानाद्वारे दोन नेत्रहीनांना दृष्टी देण्याचं महान कार्य केलं. त्यांच्या इच्छे प्रमाणे त्यांचे नेत्रदान दिशा इंटरनॅशनल आय बँक मध्ये करण्यात आले. त्यांच्या या महान निर्णयामुळे अनेकांमध्ये नेत्रदानाबाबत जागरूकता आणि प्रेरणा निर्माण झाली.


  • Mr. Atul Gaigole son of Late Ashokrao Gaigole delivering his address at the event.
  • Late Ashokrao Gaigole,

या कार्यक्रमात समाजोपयोगी कार्याला विशेष महत्त्व देण्यात आले. नेत्रदान जनजागृती आणि समाजसेवेच्या

कार्याला अधिक बळ मिळावे या उद्देशाने स्वर्गीय अशोकराव गायगोले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचे सुपुत्र श्री. अतुल गायगोले आणि संपूर्ण गायगोले परिवार यांनी दिशा इंटरनॅशनल आय बँक यांना रुग्णवाहिका प्रदान केली. हा उपक्रम समाजसेवा, मानवता आणि आरोग्यसेवेप्रती असलेल्या बांधिलकीचे प्रेरणादायी उदाहरण ठरला.


    Ambulance donated by the Gaigole family to Deesha International Eye Bank.
Ambulance donated by the Gaigole family to Deesha International Eye Bank, Amravati

अमरावतीतील नागरिकांनी या कार्यक्रमाला मोठ्या उत्साहाने प्रतिसाद दिला. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आयोजक, मान्यवर पाहुणे आणि उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. अशा प्रेरणादायी उपक्रमांमुळे केवळ व्यक्तींच्या स्मृतींना अभिवादन होत नाही, तर समाजात आशा, प्रेरणा आणि सकारात्मक परिवर्तनाची नवी ऊर्जा निर्माण होते.


  • The audience deeply engaged in the inspirational session.
  • An attentive audience during the inspiring event at Sanskrutik Bhavan Amravati
  • Mr. Swapnil Gawande delivering his address at the event.
  • Dr. Avinash Saoji (Prayas Sevankur) addressing the audience.

1 Comment


anildeshmukh
May 17

👏👌

Like
bottom of page