top of page

Eye Check-up Camp at Poha, Washim- Reaching 147 People and Delivering Countless Smiles by Deesha Mobile Eye Care Unit

दिशा ग्रुपच्या फिरत्या नेत्र चिकित्सालयाद्वारे पोहा, वाशीम येथे १४७ नागरिकांची नेत्र तपासणी

Deesha's Mobile Eye Care Unit at Poha, Washim
Deesha's Mobile Eye Care Unit at Poha, Washim

दिशा एज्युकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँक द्वारा ग्रामीण व दुर्गम भागात फिरत्या नेत्र चिकित्सालयाद्वारे वाशीम जिल्ह्यातील पोहा येथे संत तुकाराम महाराज भागवत निमित्त, १ मार्च २०२६ रोजी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.


या शिबिरामध्ये ज्येष्ठ नागरिकांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. या नेत्र तपासणी शिबिरामध्ये एकूण १४७ नागरिकांची तपासणी करण्यात आली. ज्यामध्ये बहुतांश ज्येष्ठ नागरिकांच्या नेत्र तपासणीमध्ये मोतीबिंदू व टेरेजियम आजार आढळून आले. या सर्वांना पुढील तपासणीसाठी स्थानिक धर्मदाय नेत्र रुग्णालयात पाठवण्यात येणार आहे.


या शिबिरादरम्यान दिशा ग्रुपच्या युवा कार्यकर्त्यांनी नागरिकांना नेत्रदानाचे महत्त्व समजावून सांगितले. भारतात अंधत्व ही मोठी समस्या असून, एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन कॉर्नियल अंध व्यक्तींना दृष्टी मिळू शकते, ही महत्त्वाची माहिती नागरिकांना देण्यात आली.


विशेष म्हणजे, उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा अस्थमा असलेल्या व्यक्तींनाही नेत्रदान करता येते. तसेच चष्मा वापरणाऱ्या आणि मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेल्या व्यक्तींचे डोळेही दान करता येतात.


या नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन श्री. गजानन महाराज धाडवे, श्री. महादेवराव ढेरे, श्री. मोहन धाडवे, श्री. आशिष डहाके तसेच दिशा ग्रुपचे श्री. स्वप्नील अरुण गावंडे, नेत्रचिकित्सक प्रणाली चांभारे, श्री. हिमांशू बंड, श्री. अनिल देशमुख आदी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.


Glimpse  from Eye Checkup Camp
Glimpse from Eye Checkup Camp

नियमित नेत्र तपासल्यामुळे नेत्रसंबंधी अनेक आजारांचे योग्य वेळेत निदान होऊ शकते. त्यामुळे अशा अनेक आजारांचे निदान करून व योग्य उपचार वेळेत रुग्णाला प्राप्त झाला तर अशा अनेक रुग्णांची दृष्टी जाण्यापासून आपण वाचवू शकतो. याच उद्देशाला लक्षात घेऊन दिशा एज्युकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँक द्वारा ग्रामीण व दुर्गम भागात फिरते नेत्र चिकित्सालय उपलब्ध करून देत आहे.

During Eye Check-up
During Eye Check-up

Comments


bottom of page