Bhade Family Donated Eye of Late Manjura Govindrao Bhade in Deesha International Eye Bank Amravati
स्व. मंजुरा गोविंदराव भदे यांचे दिशा इंटरनॅशनल आय बँक मध्ये नेत्रदान
मु. पो. लोटवडा, ता. दर्यापूर, अमरावती येशील रहिवासी स्व. मंजुरा गोविंदराव भदे याचे दुःखद निधन झाले. कुटूंबातील व्यक्तीच्या निधनामुळे कुटूंबियांना दुःख होणे स्वाभाविक असते. भदे परिवारावर सुद्धा दुःखाचा डोंगर कोसळले परंतु अशाही परिस्तितीत गरजूंना या जगातील रंग पाहता येतील या उद्दात भावनेने भदे परिवाराच्या सदस्यांनी स्व. मंजुरा गोविंदराव भदे यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी अमरावती मधील दिशा ग्रुप व दिशा एज्युकेशन फाऊंडेशन द्वारा संचालित दिशा इंटरनॅशनल आय बँक या धर्मदाय नेत्रपेढीला संपर्क केला. दिशा ग्रुपचे सचिव श्री स्वप्निल अरुण गावंडे, दिशा आय बँकेचे मेडिकल डिरेक्टर डॉ मनिष बबन तोटे, श्री हिमांशू प्रमोद बंड, श्री अनिल सदाशिवराव देशमुख यांनी मरणोत्तर नेत्रकमळ दान करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली.

नेत्रदानाचे पवित्र कार्य केल्याबद्दल दिशा एजुकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या अध्यक्षा सौ. कुंदा अरुण गावंडे व सचिव स्वप्निल अरुण गावंडे द्वारे भदे कुटुंबियांचे आभार व्यक्त करणात आले. भदे परीवाला नेत्रदाना केल्या बद्दल मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा अंतर्गत नेत्रदानाचे प्रमाणपत्र देण्यात आले. या सेवाभावी कार्यात भदे परिवारातिल श्री. पांडुरंग गो. भदे, डॉ. पवन भदे, श्री. निलेश घातोड व भदे परिवारातील इतर सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. दिशा ग्रुप व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या सर्व संचालक मंडळ व कार्यकर्त्यांतर्फे स्व. मंजुरा गोविंदराव भदे यांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.
भारतासमोर अंधत्व हि फार मोठी समस्या उभी आहे. एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन कॉर्नियल अंधांना दृष्टी प्राप्त होऊ शकते. उच्च रक्तदाब, मधुमेह, अस्थमा असे आजार असलेल्या व्यक्तीचे देखील नेत्रदान केले जाऊ शकते तसेच चष्मा असलेले व मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेल्या व्यक्तीचे सुध्दा नेत्रदान केले जाऊ शकते. मृत्यूनंतर सहा ते आठ तासापर्यंत नेत्रदान केले जाऊ शकते. त्यामुळे मृत्युनंतर ताबडतोब दिशा इंटरनॅशनल आय बँकेला संपर्क करावा. मृत व्यक्तीचे डोळे उघडे असल्यास ते बंद करावे व त्यावर ओले कापसाचे बोळे ठेवावे. मृत व्यक्तीच्या डोक्याखाली २ उशा ठेवाव्या आणि पंखा बंद ठेवावा तसेच ए.सी. असेल तर सुरु ठेऊ शकता.




Comments