Eye donation of late Ranjit Arunrao Deshmukh (age 40) at Deesha International Eye Bank, Amravati
“दुःखाच्या क्षणीही मानवतेची ज्योत; ४० वर्षीय मुलाचे वडिलांनी केले नेत्रदान
मु.पो. तरणोळी, जिल्हा यवतमाळ येशील रहिवासी स्व. श्री. रणजित अरुनराव देशमुख (वय ४०) यांचे दुःखद निधन झाले. देशमुख परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळले, परंतु अशाही परिस्थितीत सौ. सोनाली देशमुख यांनी श्री. अरुनराव देशमुख यांना नेत्रदानाबद्दल माहिती देऊन नेत्रदान करण्यासाठी प्रेरित केले, वडील श्री. अरुनराव देशमुख यांनी आपला मुलगा स्व. श्री. रणजित अरुनराव देशमुख (वय ४०) यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. दिशा ग्रुप व दिशा एज्युकेशन फाऊंडेशन द्वारा संचालित दिशा इंटरनॅशनल आय बँक या धर्मदाय नेत्रपेढीचे सचिव श्री. स्वप्निल अरुण गावंडे, दिशा आय बँकेचे डेप्युटी मेडिकल डिरेक्त्तर डॉ. अंकित अनिल हरवानी, श्री. हिमांशू प्रमोद बंड, श्री. अनिल सदाशिवराव देशमुख यांनी मरनोतर नेत्रकमळ दान करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली.

नेत्रदानाचे पवित्र कार्य केल्याबद्दल दिशा एज्युकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या संचालक मंडळाद्वारे देशमुख कुटुंबियांचे आभार व्यक्त करण्यात आले. देशमुख परीवाराला नेत्रदान केल्याबद्दल मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा अंतर्गत नेत्रदानाचे प्रमाणपत्र देण्यात आले. या सेवाभावी कार्यात देशमुख परिवारातील आई सौ. लता देशमुख, बहीण सौ. गौरी देशमुख, सौ. रसिका देशमुख तसेच परिवारातील इतर सदस्यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. दिशा ग्रुप व दिशा इंटरनॅशनल आय बँकेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी स्व. श्री. रणजित अरुनराव देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण केली.

भारतामध्ये कॉर्नियल अंधत्व ही गंभीर समस्या बनत चालली आहे. एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन अंध व्यक्तींना दृष्टी मिळू शकते. विशेष म्हणजे उच्च रक्तदाब, मधुमेह, दमा, चष्मा असणे किंवा मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेले असले तरीही नेत्रदान करता येते. मृत्यूनंतर सहा ते आठ तासांच्या आत नेत्रदान केले जाऊ शकते.
मृत्यूनंतर तात्काळ डोळे बंद करून त्यावर ओले कापसाचे बोळे ठेवावेत, डोक्याखाली दोन उशा ठेवाव्यात आणि पंखा बंद ठेवावा. ए.सी. सुरू ठेवला तरी चालतो. त्यामुळे मृत्युनंतर ताबडतोब दिशा इंटरनॅशनल आय बँकेला संपर्क करावा.
नेत्रदानासाठी संपर्क: 9899898667 | 7378656145




Comments