Buddhadev Family donated the eyes of Late Khushalchand Premji Buddhadev in Deesha International Eye Bank (Branch: Yavatmal)
- anildeshmukh
- 23 hours ago
- 2 min read
स्व. श्री. खुशालचंद प्रेमजी बुद्धदेव यांचे
दिशा इंटरनॅशनल आय बँक (शाखा : यवतमाळ) मध्ये नेत्रदान
सरदार चौक, यवतमाळ येशील रहिवासी स्व. श्री. खुशालचंद प्रेमजी बुद्धदेव यांचे दुःखद निधन झाले. बुद्धदेव परिवारावर दुःखाचे डोगर कोसळले, परंतु अशाही परिस्थितीत पत्नी श्रीमती शिला बुद्धदेव यांनी स्व. श्री. खुशालचंद प्रेमजी बुद्धदेव यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी संजीवन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, यवतमाळ व दिशा एज्युकेशन फाउंडेशन, अमरावती द्वारा संचालित दिशा इंटरनॅशनल आय बँक, (शाखा : यवतमाळ) या धर्मदाय नेत्रपेढीला संपर्क केला. दिशा ग्रुपचे सचिव श्री स्वप्निल अरुण गावंडे, दिशा आय बँकेचे मेडिकल डिरेक्त्तर डॉ. आशिष पोटफोडे, डॉ. विजय कावलकर, श्री. विशाल विर यांनी मरणोत्तर नेत्रकमळ दान करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली.

नेत्रदानाचे पवित्र कार्य केल्याबद्दल दिशा एज्युकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या संचालक मंडळाद्वारे बुद्धदेव कुटुंबियांचे आभार व्यक्त करण्यात आले. बुद्धदेव परीवाराला नेत्रदान केल्याबद्दल मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा अंतर्गत नेत्रदानाचे प्रमाणपत्र देण्यात आले. या सेवाभावी कार्यात बुद्धदेव परिवारातील श्रीमती शिला बुद्धदेव, श्री. पियूष मजेठीया, श्री. किशोर अतारा व इतर सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. दिशा ग्रुप व दिशा इंटरनॅशनल आय बँकेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी स्व. श्री. खुशालचंद प्रेमजी बुद्धदेव यांना श्रद्धांजली अर्पण केली.

भारतामध्ये कॉर्नियल अंधत्व ही गंभीर समस्या बनत चालली आहे. एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन अंध व्यक्तींना दृष्टी मिळू शकते. विशेष म्हणजे उच्च रक्तदाब, मधुमेह, दमा, चष्मा असणे किंवा मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेले असले तरीही नेत्रदान करता येते. मृत्यूनंतर सहा ते आठ तासांच्या आत नेत्रदान केले जाऊ शकते.
मृत्यूनंतर तात्काळ डोळे बंद करून त्यावर ओले कापसाचे बोळे ठेवावेत, डोक्याखाली दोन उशा ठेवाव्यात आणि पंखा बंद ठेवावा. ए.सी. सुरू ठेवला तरी चालतो. मृत्युनंतर ताबडतोब दिशा इंटरनॅशनल आय बँकेला संपर्क करावा.
नेत्रदानासाठी संपर्क: 9899898667 | 7378656145




Comments