“Caring for Young Eyes - Deesha Group Organize Eye Checkup Camp at AMC Urdu School No.10 Badnera”
- anildeshmukh
- Mar 5
- 1 min read
दिशा ग्रुपच्या फिरते नेत्र चिकिसालय द्वारा म.न.पा उर्दू उच्च प्राथमीक शाळा क्र.१० बडनेरा मध्ये ३९८ विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी
दि. ३० जानेवारी २०२५ रोजी दिशा एज्युकेशन फाउंडेशन, अमरावती संचालित फिरते नेत्र चिकित्सालय अंतर्गत बडनेरा, अमरावती येथील म.न.पा. उर्दू उच्च प्राथमिक शाळा क्र. १० येथे विद्यार्थ्यांसाठी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात एकूण ३९८ विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली.

या तपासणी दरम्यान विद्यार्थ्यांना योग्य चष्म्याचा नंबर दिला गेला तसेच डोळ्यांची योग्य निगा कशी राखावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. काही विद्यार्थ्यांमध्ये विशेष नेत्रविकार आढळल्याने त्यांना पुढील तपासणीसाठी स्थानिक धर्मदाय नेत्र रुग्णालयात पाठविण्यात येणार आहे. शिबिराच्या माध्यमातून दिशा ग्रुपच्या युवा कार्यकर्त्यांनी नेत्रदानाचे महत्त्व नागरिकांना समजावून सांगितले तसेच नेत्रदानाविषयीचे गैरसमज दूर केले.
या शिबिराच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. मो. इमरान सर होते. तसेच सर्व शिक्षकवृंद, दिशा ग्रुपचे श्री. स्वप्नील अरुण गावंडे, नेत्र चिकित्सक कु. प्रणाली चांभारे, श्री. हिमांशू बंड, श्री. अनिल देशमुख व इतर कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.
नेत्रदानाचे महत्त्व
भारतासमोर अंधत्व ही मोठी समस्या असून, एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन कॉर्नियल अंध व्यक्तींना दृष्टी मिळू शकते. उच्च रक्तदाब, मधुमेह, अस्थमा असलेल्या व्यक्तींनाही नेत्रदान करता येते. चष्मा लावणाऱ्या किंवा मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेल्या व्यक्तींचेही नेत्रदान होऊ शकते. “नेत्रदान – श्रेष्ठ दान” या संकल्पनेला बल देत दिशा ग्रुप समाजात नेत्रदानाबाबत जागरूकता निर्माण करण्याचे कार्य सातत्याने करत आहे.
Comentarios