top of page

Correcting EyeSight at Kaundnyapur through the Mobile Eye Care Unit

दिशा एज्युकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँक द्वारा अमरावती जिल्हा मधील ग्रामीण भागात वसलेल्या कौंडण्यपूर या गावामधील इस्कॉन मंदिर येथे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेच्या सुसज्ज अश्या फिरते नेत्र चिकिसालय मध्ये १८७ जेष्ठ नागरिक व मुलांचे मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. बहुतांश जेष्ठ नागरिकांच्या नेत्र तपासणी मध्ये मोतियाबिंदू व टेरेजियम आजार आढळून आले. या सर्वांना पुढील तपासणीसाठी विविध धर्मदाय नेत्र रुग्णालय मध्ये पाठवण्यात येणार आहे.

नेत्र तपासणी शिबीर कौंडण्यपूर
नेत्र तपासणी शिबीर कौंडण्यपूर

या नेत्र तपासणी शिबिराच्या आयोजन करीत रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडियाचे श्री सत्यनारायण रतवा तसेच दिशा ग्रुपचे श्री हिमांशू प्रमोद बंड, श्री अनिल सदाशिवराव देशमुख, श्रीमती भारती तसरे, श्री मोहम्मद नावेद आदी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.



आपण देखील आपल्या गावात नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करून भारताला अंधत्व पासून मुक्त करण्यात महत्वाचा सहभाग देऊ शकता. आजच दिशा ग्रुपला 8275539754 / 7378656145 वर संपर्क करा.

Comments


bottom of page