दिशा ग्रुपच्या फिरते नेत्र चिकिसालय द्वारा कुरळ पुर्णा मध्ये १९१ नागरिकांची नेत्र तपासणी
दिशा एज्युकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँक द्वारा अमरावती जिल्हा मधील ग्रामीण व दुर्गम भागात वसलेल्या कुरळ पुर्णा या गावामधील भगवानदास महाराज मंदिर येथे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेच्या सुसज्ज अश्या फिरते नेत्र चिकिसालय मध्ये १९१ जेष्ठ नागरिक व मुलांचे मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. बहुतांश जेष्ठ नागरिकांच्या नेत्र तपासणी मध्ये मोतियाबिंदू व टेरेजियम आजार आढळून आले. या सर्वांना पुढील तपासणीसाठी विविध धर्मदाय नेत्र रुग्णालय मध्ये पाठवण्यात येणार आहे.
या नेत्र तपासणी शिबिराच्या आयोजन करीत श्री विनायक देशमुख, श्री विलास काळे, श्री भडांगे तसेच दिशा ग्रुपचे श्री स्वप्नील अरुण गावंडे, श्री हिमांशू प्रमोद बंड, श्री अनिल सदाशिवराव देशमुख, श्रीमती भारती तसरे आदी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.
नियमित नेत्र तपासल्यामुळे नेत्र संबधी अनेक आजाराचे योग्य वेळेत निदान होऊ शकते. त्यामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील लोकांना देखील नियमित चालगल्या गुणवत्तेची नेत्र चिकित्सा दिशा एज्युकेशन फाऊंडेशनच्या फिरते नेत्र चिकित्सालय द्वारे करून दिली जाते. आपण देखील आपल्या गावात अश्या शिबिराचे आयोजन करण्याकरिता दिशा ग्रुपला 8275539754 वर संपर्क करू शकता
Comments