दिशा ग्रुपच्या फिरते नेत्र चिकिसालय द्वारा दत्तकग्राम परलाम, तालुका भातकुली, मध्ये ८९ नागरीकांची नेत्र तपासणी
दिशा एज्युकेशन फाउंडेशन अमरावती व महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, अमरावती तर्फे दि. ०२ मार्च २०५ रोजी दत्तकग्राम परलाम येथे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावातील नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली.

या नेत्र तपासणी शिबिरामध्ये एकूण ८९ नागरिकांची तपासणी करण्यात आली. या नेत्रतपासणी मध्ये चष्म्याचे योग्य नंबर काढून देण्यात आले. आपण आपल्या डोळ्याची कश्या प्रकारे काळजी घेऊ शकतो या साठी मार्गदर्शन करण्यात आले. काही रुग्णांना पुढील तपासणीसाठी स्थानिक धर्मदाय नेत्र रुग्णालय मध्ये पाठवण्यात येणार आहे. दिशा ग्रुपच्या युवा कार्यकर्त्यांनी नागरिकांना नेत्रदानाची माहिती देऊन त्याबद्दलचे गैर समज दूर केले.
आयोजित सभेच्या अध्यक्षस्थानी अस्मिता शिक्षण मंडळाचे अध्यक्षा मा. प्राचार्य डॉ. मीनल भोंडे, प्रमुख उपस्थिती श्री. स्वप्नील अरुण गावंडे तसेच जिल्हा समन्वयक अमरावती शहर, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ मा. डॉ. विशाल गजभिये यांनी शिबिराला सदिच्छ भेट दिली. तसेच दिशा ग्रुपचे नेत्र चिकित्सक कु. प्रणाली चांभारे, श्री. हिमांशू बंड, श्री. अनिल देशमुख महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय अमरावती चे डॉ. सुशांत ठोके रा. से. यो. कार्यक्रमाधिकारी व महिला रा. से. यो. कार्यक्रमाधिकारी प्रा. विद्या अंभोरे, सहित विद्यार्थी सलोनी कळस्कर, संजना चव्हाण, तनुषा चव्हाण, विपुल देशमुख, सुरज वंजारी, समीर शेख, अनिकेत सवाई, प्राची पाटभाजे आदी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.
भारतासमोर अंधत्व हि फार मोठी समस्या उभी आहे. एक व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन कॉर्नियल अंधांना दृष्टी प्राप्त होऊ शकते. उच्च रक्तदाब, मधुमेह, अस्थमा इत्यादी आजार असलेले व्यक्ती देखील नेत्रदान करू शकतात. चष्मा असलेले व मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेल्या व्यक्तीचे सुध्दा नेत्रदान केले जाऊ शकते
Comments