Dubey Family's Noble Eye Donation at Deesha Eye Bank, Yavatmal
स्व. ममता मधुकरराव दुबे यांचे दिशा आय बँक यवतमाळ मध्ये नेत्रदान
गोधनी रोड, टिळक वाडी, यवतमाळ येथील रहिवासी स्व. ममता मधुकरराव दुबे यांचे दुःखद निधन झाले. कुटूंबातील व्यक्तीच्या निधनामुळे कुटूंबियांना दुःख होणे स्वाभाविक असते. दुबे परिवारावर सुद्धा दुःखाचा डोगर कोसळले परंतु अशाही परिस्थितीत गरजूंना या जगातील रंग पाहता येतील या उद्दात भावनेने दुबे परिवाराच्या सदस्यांनी स्व. ममता मधुकरराव दुबे यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी यवतमाळ मधील दिशा ग्रुप व दिशा एज्युकेशन फाऊंडेशन द्वारा संचालित दिशा आय बँक या धर्मदाय नेत्रपेढीला संपर्क केला. दिशा ग्रुपचे सचिव श्री स्वप्निल अरुण गावंडे, दिशा आय बँकेचे मेडिकल डायरेक्टर डॉ. आशिष पोटफोळे, डॉ. विजय कावलकर, श्री. विशाल विर यांनी मरनोतर नेत्रकमळ दान करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली.

नेत्रदानाचे पवित्र कार्य केलाबद्दल दिशा एजुकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या अध्यक्षा सौ. कुंदा अरुण गावंडे व सचिव स्वप्निल अरुण गावंडे द्वारे दुबे कुटुंबियांचे आभार व्यक्त करण्यात आले. दुबे परिवाराला नेत्रदान केल्या बद्दल मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा अंतर्गत नेत्रदानाचे प्रमाणपत्र देण्यात आले. या सेवाभावी कार्यात दुबे परिवारातिल श्री. मनिष दुबे, श्री. विठ्ठल परांडे, श्री. विजय विसपुते व दुबे परिवारातील इतर सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. दिशा ग्रुप व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या सर्व संचालक मंडलाने व कार्यकर्त्यांतर्फे स्व. ममता मधुकरराव दुबे यांना श्रद्धांजली अर्पित करणात आली.
भारतासमोर अंधत्व हि फार मोठी समस्या उभी आहे. एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन कॉर्नियल अंधांना दृष्टी प्राप्त होऊ शकते. उच्च रक्तदाब, मधुमेह, अस्थमा असे आजार असलेल्या व्यक्तीचे देखील नेत्रदान केले जाऊ शकते तसेच चष्मा असलेले व मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेल्या व्यक्तीचे सुध्दा नेत्रदान केले जाऊ शकते. मृत्यूनंतर सहा ते आठ तासापर्यंत नेत्रदान केले जाऊ शकते. त्यामुळे मृत्युनंतर ताबडतोब दिशा इंटरनॅशनल आय बँकेला संपर्क करावा. मृत व्यक्तीचे डोळे उघडे असल्यास ते बंद करावे व त्यावर ओले कापसाचे बोळे ठेवावे. मृत व्यक्तीच्या डोक्याखाली २ उशा ठेवाव्या आणि पंखा बंद ठेवावा तसेच ए.सी. असेल तर सुरु ठेऊ शकता.
नेत्रदानासाठी संपर्क: ७३७८६५६१४५ । ७३७८६५६१४४ । ९८९९८९८६६७




Comments