Empowering girls with better eyesight
१००८ भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त कंकुबाई श्रविकाश्रम शाळेतील विद्यार्थिनींचे नेत्र तपासणी दिशा ग्रुपच्या फिरते नेत्र चिकिसालय द्वारा करण्यात आली
दिशा एज्युकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँक द्वारा ग्रामीण व दुर्गम भागात नेत्र चिकित्सा फिरते नेत्र चिकित्सालय द्वारे उपलब्ध करून दिली आहे. या फिरत्या नेत्र चिकिसालय द्वारा १००८ भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त वाशीम जिल्हा मधील कारंजा (लाड) मधील कंकुबाई श्रविकाश्रम येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये गुरुकुल मधील निवासी मुलींचे मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. कार्यक्रमास गटशिक्षणाधिकारी श्रीकांत माने, डॉ. शार्दूल डोंणगावकर, डॉ अजय कांत, कंकुबाई संस्थेचे सचिव सजीव रुईवाले, ठाणेदार आधारसिंह सोनोने, डॉ. पंकज काटोले,डॉ. अजय कांत हे उघटनासाठी उपस्थित होते.

या नेत्र तपासणी शिबिरामध्ये एकूण १५० निवासी मुलींचे मोफत नेत्रतपासणी करून देण्यात अली. या नेत्रतपासणी मध्ये ज्या मुलींना चष्म्याची गरज होती त्यांना योग्य नंबर काढून देण्यात आले. त्याच बरोबर त्यांना आपण आपल्या डोळ्याची कश्या प्रकारे काळजी घेऊ शकतो या साठी जोग्या मार्ग दर्शन करण्यात आले. दिशा ग्रुपच्या युवा कार्यकर्त्यांनी नागरिकांना नेत्रदानाची माहिती देऊन त्याबद्दलचे गैर समज दूर केले. त्याचा बरोबर दिशा ग्रुप चे सचिव स्वप्नील अरुण गावंडे यांनी नेत्रदान संबधी माहिती देताना म्हणाले की, "नेत्रदानाची चळवळ व्यापक करून प्रचार करावा. नेत्रदानाचा टक्का वाढला तरच नेत्रहिनांना दृष्टी मिळेल".
या नेत्र तपासणी शिबिराच्या आयोजन करीत कंकुबाई श्रविकाश्रम च्या प्रज्ञा डोंणगावकर, मुख्याध्यापिका श्रीमती भंडागे, श्रीमती प्रिता भोगाडे व सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले व संस्थेच्या इतर पदाधिकाऱ्यानी तसेच दिशा ग्रुपचे श्री स्वप्नील अरुण गावंडे, श्री हिमांशू बंड, श्रीमती भारती तसरे, श्री मोहम्मद नावेद आदी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.