top of page

Eye Checkup Camp at Ghatladki

Writer: Himanshu Band
Himanshu Band
Dec 25, 2022
1 min read

दिशा ग्रुपच्या फिरते नेत्र चिकिसालय द्वारा घाटलाडकी मध्ये ११८ नागरिकांची नेत्र तपासणी


दिशा एज्युकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँक द्वारा ग्रामीण व दुर्गम भागात नेत्र चिकित्सा फिरते नेत्र चिकित्सालय द्वारे उपलब्ध करून दिली आहे. या फिरत्या नेत्र चिकिसालय द्वारा अमरावती जिल्हा मधील धाटलाडकी या गावामधील शिवराव विद्यालया येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये जेष्ठ नागरिक व मुलांचे मोफत नेत्र तपासणी करण्यात आली.



या नेत्र तपासणी शिबिरामध्ये एकूण ११८ नागरिकांची तपासणी करण्यात आली ज्यामध्ये १०९ जेष्ठ नागरिकांची तर ९ मुल होती. बहुतांश जेष्ठ नागरिकांच्या नेत्र तपासणी मध्ये मोतियाबिंदू व टेरेजियम आजार आढळून आले. या सर्वांना पुढील तपासणी साठी स्थानिक धर्मदाय नेत्र रुग्णालय मध्ये पाठवण्यात येणार आहे.



या नेत्र तपासणी शिबिराच्या आयोजन करीत विनायक देशमुख, विलास काळे, भडांगे तसेच दिशा ग्रुपचे श्री स्वप्नील अरुण गावंडे, श्री हिमांशू प्रमोद बंड, श्रीमती भारती तसरे, श्री मोहम्मद नावेद आदी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.


नियमित नेत्रतपासनू मुळे नेत्र संबधी अनेक आजाराचे योग्य वेळेत निदान होऊ शकतो. त्यामुळे अश्या अनेक आजाराचे निदान करून व योग्य उपचारा वेळेत रुग्णाला प्राप्त झाला तर अश्या अनेक रुग्णाची दृष्टी जाण्यापासून आपण वाचवू शकतो. याचा उद्देशाला लक्षात घेऊन दिशा एज्युकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँक द्वारा ग्रामीण व दुर्गम भागात नेत्र चिकित्सा फिरते नेत्र चिकित्सालय द्वारे उपलब्ध करून देत आहे.




 
 
 

Comments


bottom of page