Free Eye Examination Camp at Takarkheda Shambbhu
- Himanshu Band
- Mar 26, 2023
- 1 min read
राम नवमी च्य निमित्त्याने टाकरखेडा (शंभू) येथे दिशा एज्युकेशन फाऊंडेशन व श्रीराम मंदिर संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन
दिशा एज्युकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँक द्वारा ग्रामीण व दुर्गम भागात नेत्र चिकित्सा फिरते नेत्र चिकित्सालय द्वारे उपलब्ध करून दिली आहे. या फिरत्या नेत्र चिकिसालय द्वारा श्री राम नवमी निमित्त अमरावती मधील टाकरखेडा (शंभू) मधील श्रीराम मंदिर संस्थान येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये जेष्ठ नागरिक, महिला, मुलांचे व गरजुंची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली.

या नेत्र तपासणी शिबिरामध्ये एकूण १६६ नागरिकांची तपासणी करण्यात आली या मध्ये पुरुष, महिला, मुले याची मोफत नेत्रतपासणी करून देण्यात अली. या नेत्रतपासणी मध्ये चष्म्याचे योग्य नंबर काढून देण्यात आले. मोबाईलच्या वाढलेल्या वापरामुळे तरुणांमध्ये नव्याने आढळणारा डोळ्यांचा कोरडेपणा (ड्राय आय) याचे सुद्धा रुग्ण आढळले. त्यासाठी त्यांना आपण आपल्या डोळ्याची कश्या प्रकारे काळजी घेऊ शकतो या साठी जोग्या मार्ग दर्शन करण्यात आले. त्याच बरोबर काही मुलांमध्ये व लोकांमध्ये टेरेजियम हा आजरा सुद्धा आढळला. बहुतांश जेष्ठ नागरिकांच्या नेत्र तपासणी मध्ये मोतियाबिंदू आजार आढळून आले. जेष्ठाना असलेल्या मोतियाबिंदू च्या ऑपरेशन संबधी समुपदेशन करण्यात आले. यातील काही रुग्णांना पुढील तपासणी साठी स्थानिक धर्मदाय नेत्र रुग्णालय मध्ये पाठवण्यात येणार आहे. दिशा ग्रुपच्या युवा कार्यकर्त्यांनी नागरिकांना नेत्रदानाची माहिती देऊन त्याबद्दलचे गैर समज दूर केले.
या नेत्र तपासणी शिबिराच्या आयोजन करीत श्रीराम मंदिर संस्थान चे अध्यक्ष योगेश देशमुख व संस्थेच्या इतर पदाधिकाऱ्यानी तसेच दिशा ग्रुपचे श्री स्वप्नील अरुण गावंडे, श्री हिमांशू बंड, श्रीमती भारती तसरे, श्री मोहम्मद नावेद आदी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.
Comments