top of page

Eye checkup in Talwel

Writer's picture: Himanshu BandHimanshu Band

Updated: Oct 21, 2023

दिशा ग्रुपच्या फिरते नेत्र चिकिसालय द्वारा तळवेल मध्ये १२६ नागरिकांची नेत्र तपासणी


दिशा एज्युकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँक द्वारा ग्रामीण व दुर्गम भागात नेत्र चिकित्सा फिरते नेत्र चिकित्सालय द्वारे उपलब्ध करून दिली आहे. या फिरत्या नेत्र चिकिसालय द्वारा अमरावती जिल्हा मधील तळवेल या गावामधील शंकर विद्यालय येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये जेष्ठ नागरिक व मुलांचे मोफत नेत्र तपासणी करण्यात आली.



या नेत्र तपासणी शिबिरामध्ये एकूण १२६ नागरिकांची तपासणी करण्यात आली ज्यामध्ये ३० जेष्ठ नागरिकांची तर ७ मुल होती. बहुतांश जेष्ठ नागरिकांच्या नेत्र तपासणी मध्ये मोतियाबिंदू व टेरेजियम आजार आढळून आले. व त्याच बरोबर तरुणांमध्ये नव्याने आढळणारा डोळ्यांचा कोरडेपणा (ड्राय आय) याचे सुद्धा रुग्ण आढळले. या सर्वांना पुढील तपासणी साठी स्थानिक धर्मदाय नेत्र रुग्णालय मध्ये पाठवण्यात येणार आहे. दिशा ग्रुपच्या युवा कार्यकर्त्यांनी नागरिकांना नेत्रदानाची माहिती देऊन त्याबद्दलचे गैर समज दूर केले.



या नेत्र तपासणी शिबिराच्या आयोजन करीत श्री नरेंद्र देशमुख, श्री राजेंद्र उपख्या राजाभाऊ देशमुख, श्री दिलीप वानखडे, श्री भास्कर काळे तसेच दिशा ग्रुपचे श्री स्वप्नील अरुण गावंडे, श्री हिमांशू बंड, श्रीमती भारती तसरे, श्री मोहम्मद नावेद, कु गौरी काळे आदी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.



11 views0 comments

Comments


bottom of page