स्व. श्रीमती मनुताई प्रल्हाद कोल्हे यांचे दिशा इंटरनॅशनल आय बँक मध्ये नेत्रदान
लोकमान्य कॉलनी, अमरावती येशील रहिवासी स्व.श्रीमती मनुताई प्रल्हाद कोल्हे यांना शनिवार दिनांक १३ एप्रिल रोजी देवाज्ञा झाली. मृतुप्रांत श्री क्षितीज पाटणकर यांनी कोल्हे परिवाराला नेत्रदाना बद्दल माहिती देऊन नेत्रदान करण्यास प्रेरित केले. कोल्हे परिवाराने दुःखाचा डोगर बाजूला सावरून अशाही परिस्तिथीत गरजूंना या जगातील रंग पाहता येतील या उद्दात भावनेने स्व. श्रीमती मनुताई प्रल्हाद कोल्हे यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला व अमरावती मधील दिशा ग्रुप द्वारा संचालित दिशा इंटरनॅशनल आय बँक या धर्मदाय नेत्र पेढीला संपर्क केला. दिशा ग्रुपचे सचिव श्री स्वप्निल अरुण गावंडे, दिशा आय बँकेचे मेडिकल डिरेक्त्तर डॉ मनिष बबन तोटे, श्री हिमांशू प्रमोद बंड, श्री अनिल सदाशिवराव देशमुख यांनी मरनोतर नेत्रकमळ दान करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली.
नेत्रदानाचे पवित्र कार्य केलाबद्दल दिशा एजुकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या अध्यक्षा सौ. कुंदा अरुण गावंडे व सचिव स्वप्निल अरुण गावंडे द्वारे कोल्हे कुटुंबियांचे आभार व्यक्त करणात आले. कोल्हे परीवाला नेत्रदाना केल्या बद्दल मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा अंतर्गत नेत्रदानाचे प्रमाणपत्र देण्यात आले. या सेवाभावी कार्यात कोल्हे परिवारातिल श्री महेश कोल्हे, श्री क्षितीज पाटणकर, श्री उमेश उमप, व कोल्हे परिवारातील इतर सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. दिशा ग्रुप व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या सर्व संचालक मंडलाने व कार्यकर्त्यांतर्फे स्व. श्रीमती मनुताई प्रल्हाद कोल्हे यांना श्रद्धांजली अर्पित करणात आली.
भारतासमोर अंधत्व हि फार मोठी समस्या उभी आहे. एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन कॉर्नियल अंधांना दृष्टी प्राप्त होऊ शकते. उच्च रक्तदाब, मधुमेह, अस्थमा असे आजार असलेल्या व्यक्तीचे देखील नेत्रदान केले जाऊ शकते तसेच चष्मा असलेले व मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेल्या व्यक्तीचे सुध्दा नेत्रदान केले जाऊ शकते. मृत्यूनंतर सहा ते आठ तासापर्यंत नेत्रदान केले जाऊ शकते. त्यामुळे मृत्युनंतर ताबडतोब दिशा इंटरनॅशनल आय बँकेला संपर्क करावा. मृत व्यक्तीचे डोळे उघडे असल्यास ते बंद करावे व त्यावर ओले कापसाचे बोळे ठेवावे. मृत व्यक्तीच्या डोक्याखाली २ उशा ठेवाव्या आणि पंखा बंद ठेवावा तसेच ए.सी. असेल तर सुरु ठेऊ शकता.
Comments